राजाबाबूची राजकारणात पुन्हा एंट्री; इतक्या कोटीची आहे संपत्ती

Actor Govinda Lok Sabha Election 2024 : गोविंदा राजकारणात सक्रीय झाला आहे. दोन दशकानंतर बॉलिवूडच्या या हिरो नंबर वनने शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. यापूर्वी 2004 मध्ये तो जायंट किलर ठरला होता. त्याने त्यावेळी राम नाईक यांचा पराभव केला होता.

राजाबाबूची राजकारणात पुन्हा एंट्री; इतक्या कोटीची आहे संपत्ती
गोविंदा इतक्या संपत्तीचा धनी
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 10:51 AM

जवळपास दोन दशकाच्या राजकीय वनवासानंतर गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय झाला आहे. 2004 साली गोविंद जायंट किलर ठरला होता. त्याने भाजपचे राम नाईक यांना पराभूत केले होते. पण त्यानंतर तो अचानक राजकारणापासून दूर गेला. त्याने चित्रपटातही काम करणे कमी केले. पण आता हा हिरो नंबर 1 पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. दोन दशकांच्या राजकीय वनवासानंतर त्याने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर गोविंदा मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. गोविंदा हा धनकुबेर आहे, तो इतक्या संपत्तीचा मालक आहे.

इतक्या संपत्तीचा मालक गोविंदा

बॉलिवूडचा राजाबाबू पुन्हा राजकारणात सक्रीय झाला आहे. मुंबईतून त्याला लोकसभा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. तो गेल्या काही वर्षांपासून राजकारण आणि सिनेमांपासून दूर होता. Myneta.info वरील माहितीनुसार, 2004 मध्ये त्याने निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले, त्यातील आकडीवर नजर टाकल्यास गोविंदाची एकूण नेटवर्थ 14 कोटी रुपये इतकी होती. आता 20 वर्षानंतर या संपत्तीचे मूल्य जवळपास 150 कोटींच्या घरात पोहचते.

हे सुद्धा वाचा

‘चीची’ ची दरवर्षीची कमाई किती

गोविंदाला चीची या नावाने पण ओळखले जाते. गोविंदाने किती तरी हिट फिल्म दिलेल्या आहेत. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटातून त्याने मुख्य कमाई केली. तर ब्रँड्स एंडोर्समेंट्समधून पण त्याला चांगले उत्पन्न मिळाले. एका अंदाजानुसार, गोविंदा वार्षिक जवळपास 12 कोटी रुपये कमाई करतो. म्हणजे महिन्याला त्याचा कमाईचा आकडा हा एक कोटी रुपयांच्या घरात आहे.

मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता

गोविंदा आलिशान जीवन जगतो. मुंबईत त्याचा मोठा बंगला आहे. त्याच्याकडे मायानगरीत दोन मोठ्या आणि महागडी मालमत्ता आहे. त्यातील एक जुहूमधील रुहिया पार्कमध्ये आहे तर दुसरी मडआयलँडमध्ये आहे. त्याच्या घराची अंदाजे किंमत 16 कोटींच्या घरात आहे. तर इतर अनेक मालमत्तेतही त्याचा वाटा, गुंतवणूक आहे.

एका चित्रपटासाठी इतके कोटी

एका चित्रपटासाठी गोविंदा जवळपास 5-6 कोटी रुपये घेतो. तर ब्रँड एंडोर्स करण्यासाठी तो जवळपास 2 कोटी रुपये शुल्क घेतो. त्याच्याकडे आलिशान कारचा ताफा आहे. रिपोर्टनुसार, गोविंदाकडे Mitsubishi Lancer, Ford Endeavor यासारख्या महागड्या कार आहेत.

Non Stop LIVE Update
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.