
Blinkit आणि Zepto सारख्या कंपन्यांची १० मिनिटांत डिलिव्हरी सर्व्हीस पुन्हा वादात सापडली आहे. गिग वर्कर्स युनियनने या मॉडेलला असुरक्षित म्हणत ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. युनियनची मागणी आहे की वेगवान डिलिव्हरीच्या दबावाने डिलिव्हरी पार्टनर्सची सुरक्षा आणि अधिकारांवर आक्रमण होत आहे. New Years Eve वर होणाऱ्या या App Bandh संपाने अनेक शहरातील डिलिव्हरी सर्व्हीस प्रभावित होऊ शकते.
गिग वर्कर्स यूनियनचे म्हणणे आहे की १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेल डिलिव्हरी एजंट्सवर धोकादायकरित्या दबाव येत आहे. वेळेवर डिलिव्हरी देण्याच्या नादात रस्ते सुरक्षेचे नियमांचे पालन होत नाही. उशीर रेस्टॉरंट वा ग्राहकांमुळे झालेला असला तरी शिक्षा मात्र डिलिव्हरी एजंट्सना मिळत आहे. याच कारणामुळे या मॉडेलला पूर्णपणे बॅन करण्याची मागणी वाढत आहे.
इंडियन फेडरेशन ऑफ ऐप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि गिग आणि प्लॅटफॉर्म सेवा श्रमिक संघ सहित अनेक राष्ट्रीय यूनियननी ३१ डिसेंबर रोजी ‘App Bandh’ चे आवाहन केले आहे.याधी २५ डिसेंबर रोजी संप झाला होता. तेव्हा गुरुग्राम आणि दिल्लीतील काही भागातील डिलिव्हरी सेवा प्रभावित झाली होती. युनियन लीडरच्या मते New Years Eve च्या मते संपाचा जास्त परिणाम होऊ शकतो,खास करुन बंगलुरु सारख्या मोठ्या शहरात याचा परिणाम होईल असे म्हटले जात आहे.
गिग वर्कर्सची मागणी आहे की प्लॅटफॉर्म कंपन्यांना श्रम कायद्याच्या कक्षेत आणावे. याच सोबत १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलवर बंदी आणावी, मनमर्जीच्या ID ब्लॉक आणि पॅनल्टी सिस्टीमला समाप्त करावे असा मागण्या आहेत. युनियन चांगले आणि पारदर्शी वेतन, सामाजिक सुरक्षितता आणि सामुहिक सौदेबाजीच्या अधिकारांची मागणी करत आहे.या मुद्यांवर श्रममंत्रालयाला पत्र देखील लिहीले आहे.
अनेक डिलिव्हरी एंजट संपात सहभागी होऊ इच्छीत आहे. परंतू त्यांना ब्लॅकलिस्ट होण्याची भीती सतावत आहे. IFAT चे अध्यक्ष प्रशांत सावरडेकर यांच्या मते अनेक वर्कर्स विरोध करु इच्छीत आहेत. परंतू कंपनीच्या कारवाईला ते भित आहे. प्रत्येक चुकीची शिक्षा डिलिव्हरी एजंट्सना दिली जात आहे. मग चुकी त्यांची असो वा नसो.
New Years Eve संपाचा परिणाम रेस्टॉरंटच्या व्यवसायावरही पडू शकतो. अनेक हॉटेल आणि फूड आऊटलेट्सना डिलिव्हरीमध्ये अडचणी येण्याची भिती आहे. काही छोट्या रेस्टॉरंटने त्यांच्या स्टाफकडून डिलिव्हरी करण्याची योजना बनवली आहे. परंतू मोठ्या ब्रँड्ससाठी हे तितके सोपे नाही.