एक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात!

| Updated on: Jun 12, 2022 | 5:52 PM

केंद्र सरकार एक जुलैपासून चार नवे लेबर कोड लागू करण्याच्या विचारात आहे. नवे लेबर कोड लागू झाल्यास सॅलरी, कामाचे तास आणि पीएफच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

एक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात!
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकार एक जुलैपासून चार नवे लेबर कोड (New Labour Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. नवे लेबर कोड लागू होताच तुम्हाला नोकरीच्या (Jobएक जुलैपासून नवे लेबर कोड लागू?, कामाचे तास वाढणार; वेतनात होणार कपात) ठिकाणी अनेक बदल पहायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवे लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास, हातात येणारी सॅलरी आणि पीएफच्या (EPF) नियमांमध्ये बदल होणार आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे येत्या एक जुलैपासून नव्या लेबर कोडची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापपर्यंत तरी तशी कोणतीही अधिकृत घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आलेले नाही. नवे लेबर कोड लागू झाल्यास त्याचा मोठा परिणाम हा कर्मचाऱ्यांवर दिसून येणार आहे. सध्या असलेले कामाचे तास, हातात येणारी सॅलरी, पीएफ आणि इतर अनेक नियम बदलण्याची शक्यता आहे.

कामाचे तास बदलणार

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे कामाचे तास, मात्र नवे लेबर कोड लागू होताच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना बारा तास काम करावे लागण्याची शक्यता आहे. परंतु आठवड्यात चारच दिवस काम करावे लागणार आहे तर तीन दिवस सुटी असणार आहे. चार दिवस बारा तास काम म्हणजे आठवडाभरात एकूण 48 तास काम करावे लागणार आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांकडून यापेक्षा अधिक काम करून घेता येणार नाही. कामासोबतच ओव्हर टाईमची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सॅलरी आणि पीएफ

नव्या लेबरकोडनुसार कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे एकूण पगाराच्या किमान पन्नास टक्के असणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम वाढेल, व हातात येणारा पगार कमी होईल. मात्र या सर्व गोष्टींचे फायदे संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर मिळतील. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होईल. सुट्यांच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, सुट्यांचे नियम हे पूर्वीच्याच लेबर कोडप्रमाणे असणार आहेत. मात्र कामाच्या तासांत बदल झाल्याने आठवड्याला एक सुटी होती, तिच्याऐवजी तीन साप्ताहिक सुट्या मिळण्याची शक्यता आहे.