मुकेश अंबानींच्या अँटिलियात का नाही एसी? कारण वाचून थक्क व्हाल

अँटिलियाचे हे कूलिंग तंत्रज्ञान केवळ तांत्रिक चमत्कारच नाही, तर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा एक उत्तम नमुना आहे. मुकेश अंबानी यांनी यातून एक स्पष्ट संदेश दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा समतोल साधता येऊ शकतो.

मुकेश अंबानींच्या अँटिलियात का नाही एसी? कारण वाचून थक्क व्हाल
मुकेश अंबानी अँटिलिया
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 1:49 PM

मुंबईतील मुकेश अंबानी यांचे आलिशान घर अँटिलिया नेहमी चर्चेत असते. २७ मजली या महालात काहीतरी वेगळं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अँटिलियात वातानुकूलीत यंत्रणा म्हणजे एसी नाहीत. होय, १५,००० कोटी रुपयांच्या या महालात एसीचे युनिट्स नाहीत. मग, या घराचं कूलिंग कसं केलं जातं?

सेंट्रलाइज्ड कूलिंग सिस्टीम

अँटिलियात पारंपरिक एसीचं वापर न करता, अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड कूलिंग सिस्टीम वापरली जाते. यामुळे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात थंडावा पोहोचतो. या सिस्टीममध्ये घराच्या सजावटीचा आणि पर्यावरणाचा विचार केला जातो. संगमरवराच्या भिंतींवर एसी बसवून घराचं सौंदर्य खराब होईल, म्हणून अंबानी कुटुंबाने पर्यावरणाला मदत करणारा तंत्रज्ञान निवडला.

हाय-टेक सेन्सर्स सिस्टीम

या कूलिंग सिस्टीममध्ये हाय-टेक सेन्सर्स असतात. जे घरातील तापमान मोजतात आणि गरजेनुसार थंडावा बदलतात. अभिनेत्री श्रेया धनवंतरी यांनी सांगितलं की, अँटिलियात शूटिंग करताना त्यांना थोडं थंडी वाटली, पण व्यवस्थापकांनी तापमान वाढवण्यास नकार दिला कारण ते आधीच घराच्या इंटिरिअरच्या गरजांसाठी सेट केलं होतं.

२७ व्या मजल्यावर का राहतात अंबानी?

मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासोबत अँटिलियाच्या २७ व्या मजल्यावर राहतात. यामागे पर्यावरणाचा विचार आहे. या उंचीवर राहून त्यांना अरब सागराचा सुंदर नजारा, ताज्या हवा आणि मुंबईच्या दमट हवामानापासून सुटका मिळते. या मजल्यावर केवळ अंबानी कुटुंब आणि त्यांचे विश्वासू कर्मचारीच राहतात. त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षा राखली जाते.

स्नो रूम आणि इतर अनोख्या सुविधा

अँटिलियामध्ये एक स्नो रूम आहे. जिथे भिंतींमधून बर्फाचे तुकडे पडतात. त्यामुळे खोलीत थंड वातावरण तयार होते. याशिवाय, हाय-टेक व्हेंटिलेशन सिस्टीम, हीट-रेझिस्टंट काच आणि टेरेस गार्डन्स यामुळे घरात बाहेरची उष्णता प्रवेश करत नाही.

पर्यावरणपूरक वास्तू आणि तंत्रज्ञान

अँटिलियाची रचना पर्यावरणपूरक आणि वास्तुशास्त्रानुसार केली आहे. पारंपरिक एसी न वापरण्यामागे केवळ सौंदर्य आणि ऊर्जा-बचतीचा विचार आहे. यामुळे घरावर होणारा पर्यावरणीय प्रभाव कमी होतो.