AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरमधील ‘अंबानी’, दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग, कोण आहेत मुश्ताक चाया?

मुश्ताक चाया यांनी ग्रँड मुमताज हॉटेल्सची स्थापना केली. त्यांच्या समूहाच्या काश्मीर, जम्मू आणि दिल्लीत 14 हॉटेल आहेत. त्यात सहा हॉटेल प्रतिष्ठित रेडिसन ब्रँडच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. त्या हॉटेलमध्ये श्रीनगरमधील रेडिसन कलेक्शन हॉटेल अँड स्पा रिव्हरफ्रंट आहे.

काश्मीरमधील 'अंबानी', दहशतवादाच्या छायेत उभारला अब्जावधींचा उद्योग, कोण आहेत मुश्ताक चाया?
मुश्ताक अहमद चाया Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: May 02, 2025 | 1:57 PM
Share

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रात आपला उद्योगाचा विस्तार केला आहे. त्यांच्याप्रमाणे उद्योगाचा विस्तार आपल्या भागांत करणारे काही जण आहेत. काश्मीरमध्ये जेव्हा अस्थिरता आणि दहशतवाद होता, त्या काळात एका व्यक्तीने आपला संकल्प आणि दूरदृष्टीकोनातून उद्योग उभा केला. त्यामुळे हजारो जणांना रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांना काश्मीरचे अंबानी म्हटले जाते. काश्मीरचे अंबानी असणारे हे व्यक्ती म्हणजे मुश्ताक अहमद चाया आहेत.

मुश्ताक अहमद चाया यांचा जन्म एका सामान्य परिवारात झाला. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात 1984 मध्ये गुलमर्गमधील एका लहान हॉटेलपासून सुरु केली. पर्यटन व्यवसायात त्यांनी ठेवलेले पाऊल चांगलेच यशस्वी झाली. त्यांच्याकडे आता जम्मू काश्मीर आणि दिल्लीत मिळून 14 हॉटेल्स आणि 450 खोल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटकांना हॉटेलमधील खोल्या भाड्याने देऊन अब्जावधी रुपयांची कमाई केली आहे. त्यांचा मुश्ताक हॉटेल समूह कश्मीर, जम्मू आणि दिल्लीत सर्वत्र पसरलेला आहे. त्यांची Radisson, LTH आणि Bloom या प्रतिष्ठित ब्रँड्सोबत पार्टनरशिप आहे.

मुश्ताक चाया यांनी ग्रँड मुमताज हॉटेल्सची स्थापना केली. त्यांच्या समूहाच्या काश्मीर, जम्मू आणि दिल्लीत 14 हॉटेल आहेत. त्यात सहा हॉटेल प्रतिष्ठित रेडिसन ब्रँडच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत. त्या हॉटेलमध्ये श्रीनगरमधील रेडिसन कलेक्शन हॉटेल अँड स्पा रिव्हरफ्रंट आहे. यामध्ये 212 खोल्या आहेत. मुश्ताक चाया एक यशस्वी उद्योजक नाही तर ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रसेर असतात. ते जम्मू आणि कश्मीर हॉटलियर्स क्लबचे अध्यक्ष आहेत. पीएचडी चँबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष राहिले आहेत.

काश्मीरमध्ये दहशतवाद आणि राजकीय अस्थिरता आहे. त्या परिस्थितीत मुश्ताक चाया यांनी आपला व्यवसाय वाढवत राहिला. त्याची दूरदृष्टी आणि जोखीम घेण्याची क्षमता यामुळे ते एक यशस्वी उद्योजक बनले आहे. त्यांनी केवळ त्यांचा व्यवसाय वाढवला नाही तर स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच त्यांना काश्मीरमधील अंबानी म्हटले जाते.

हे ही वाचा…

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गुप्तहेरास अटक, ISI ला पाठवले गोपनीय व्हिडिओ-फोटो

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.