
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विविध पदांसाठी ही भरती सुरू असून वयाची आणि शिक्षणाची अट ही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. एआयएआय एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेड (AIASL) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
या भरती प्रक्रियेतून आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोचीन स्टेशनसाठी रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्पे ड्रायव्हर आणि हॅन्डी मॅन/वुमन या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 208 पदे ही भरली जातील.
या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 28 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकता.
शासकीय नियमानुसार यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि रॅम्प ड्रायव्हरची मुलाखत 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. हँडी पुरुष/महिलांसाठी 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल.
जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ 683572 या पत्त्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी पोहोचावे लागेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार हा मिळणार आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेला जाण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाजून घ्यावी.