
अमेरिकेत नोकरी मिळणं हे अनेक भारतीयांचं स्वप्न असतं आणि समाजात ते एक मोठं यश मानलं जातं. तिथे मिळणारा लाखो रूपयांचा पगार ऐकायला खूप आकर्षक वाटतो. पण हा पगार खरंच भारतातल्या जीवनशैलीच्या तुलनेत फायदेशीर ठरतो का? चला, हे गणित आणि त्यामागचं वास्तव समजून घेऊया.
आज, ५ एप्रिल २०२५ रोजी १ अमेरिकी डॉलरचा विनिमय दर सुमारे ८५.५६ रुपये आहे. यानुसार, जर कोणी अमेरिकेत दरमहा १०,००० डॉलर पगार कमवत असेल, तर तो भारतात जवळपास:
१०,००० × ८५.५६ = ८,५५,६०० रुपये दर महिना
म्हणजेच, वरकरणी पाहता हा पगार भारतात जवळपास ८.५६ लाख रुपये प्रति महिना इतका होतो! पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. अमेरिकेतील खर्चाचा विचार केला, तर या रकमेची प्रत्यक्ष मूल्य भारतातल्या ३ ते ४ लाख रुपया इतकीच आहे. कारण तिथे घरभाडं, अन्न धान्य, आरोग्य सेवा आणि वाहतूक यांचा खर्च प्रचंड असतो.
1. जागतिक दर्जाची कामाची संस्कृती
2. करिअर वाढीसाठी उत्तम संधी
3. आरोग्य आणि शिक्षण सुविधा
4. विविध देशांतील प्रोफेशनल्ससोबत नेटवर्किंगची संधी
5. जागतिक पातळीवर कौशल्य वाढवण्याची संधी
भारतीयांसाठी अमेरिकेत आयटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, एआय, हेल्थकेअर, फार्मास्युटिकल्स, फायनान्स, इंजिनीअरिंग आणि R&D यांसारख्या क्षेत्रांत प्रचंड संधी आहेत. विशेषतः IT क्षेत्रात भारतीयांचा विशेष दबदबा आहे.
अमेरिकेत नोकरी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथला राहण्याचा खर्च खूप जास्त आहे, शिवाय २५ ते ३५% टॅक्स भरावा लागतो. व्हिसा आणि स्थलांतराचे नियम कडक आहेत, त्यामुळे दीर्घकालीन नियोजन करावं लागतं. याशिवाय, तिथली संस्कृती आणि जीवनशैली यांच्याशी जुळवून घेणं हेही एक आव्हान असतं.
१०,००० डॉलरचा पगार आकर्षक वाटतोच, पण अमेरिकेतील खर्च आणि जीवनशैली लक्षात घेतल्यास, त्याची आर्थिक किंमत वेगळीच भासते. तरीही, अमेरिकेत काम करणं हे केवळ पगारापुरतं मर्यादित नसून, ते एक जागतिक अनुभव, करिअर ग्रोथ आणि आत्मविकासाचं व्यासपीठ आहे. त्यामुळे अमेरिकेत काम करण्याचा विचार करत असाल, तर आर्थिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या त्याची तयारी करूनच पुढचं पाऊल उचला.