
मुंबई: नोकरी शोधताय? नौदलात जायची इच्छा आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच भारतीय नौदलात जर अधिकारी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स (SSC Officers) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदासाठी 224 जागा भरण्यात येणार आहेत. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया 7 ऑक्टोबरपासूनच ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालीये आणि उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर 2023 रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांना ही नोकरी म्हणजे स्वप्न आहे त्या लोकांनी पटापट अर्ज भरून टाका. लक्षात ठेवा उद्या शेवटचा दिवस आहे.
एक्झिक्युटिव्ह शाखेसाठी अर्ज करताना उमदेवार बीई, B.Tech डिग्री असणारा हवा. इतकंच नाही तर या डिग्री मध्ये उमेदवाराला 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणत्या एज्युकेशन ब्रांच मध्ये नोकरी हवी असेल तर तुमच्याकडे मेकॅनिकलमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. याचबरोबर संबंधित विषयांचं नॉलेज हवं. निवड झालेल्या उमेदवारांना 56,000 रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार असून अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचा ही लाभ देण्यात येणार आहे.
या रिक्त पदांच्या माध्यमातून एकूण 224 पदे भरण्यात येणार आहेत.