खबरदार; DGCAच्या विविध पदांसाठी बनावट/ फर्जी कागदपत्रं द्याल तर होऊ शकते फौजदारी, जारी केलं निवेदन

तसेच DGCA द्वारे दिलेल्या निवेदनात असेही सुचित करण्यात आले आहे की, DGCA द्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये बसण्यासाठी बनावट/खोटी कागदपत्रे सादर करणे. त्यासाठी बनावट वेबसाइट तयार करणे आणि संगणक क्रमांक मिळवणे यासाठी कठोर कारवाई केली जाईल. तर योग्य फौजदारी कारवाई देखील केली जाईल.

खबरदार; DGCAच्या विविध पदांसाठी बनावट/ फर्जी कागदपत्रं द्याल तर होऊ शकते फौजदारी, जारी केलं निवेदन
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 04, 2022 | 8:42 AM

नवी दिल्ली: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA)गुरुवारी विमान वाहतूक क्षेत्रातील विविध पदांसाठी उमेदवारी अर्ज प्राप्त मागवले होते. त्यानंतर महासंचालनालयाकडे अनेक संशयास्पद अर्ज प्राप्त झाले आहेत. तर DGCAच्या केंद्रीय परीक्षा संस्थेकडे बोगस/बनावट कागदपत्रांसह (Bogus / Fake Document) अनेक अर्ज आले होते. त्याद्वारे विविध परीक्षांमध्ये बसण्यासाठी उमेदवारी मागितली जात आहे. तर विविध परवाने, रेटिंग आणि प्रमाणपत्रे इ. जारी करण्यासाठी DGCA अर्ज मागवत असते. त्यामुळे प्राप्त झालेल्या संशयास्पद अर्जांच्या संदर्भात DGCAकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात DGCA द्वारे अंमलात असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई (Strict Action) केली जाईल, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या असे ही लक्षात आले आहे की, विमान वाहतूक क्षेत्रातील विविध पदांसाठी काही प्रकरणांमध्ये, बनावट वेबसाइट्स देखील तयार केल्या जात आहेत. अशा बनावट/ फर्जी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी DGCAकार्यरत आहे. तर असे प्रकार हे विमान वाहतूक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे. तर DGCAच्या केंद्रीय परीक्षा संस्थेकडे आलेल्या बोगस अर्जांना आणि ते करणाऱ्यांना निवेदनातून चेतावनी देण्यात आली आहे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की, अशा अर्जदारांवर DGCA द्वारे अंमलात असलेल्या तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा मार्गांचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांवर कोणत्याही परीक्षेत बसण्यावर कायमची बंदी घालण्यात येईल.