₹1.77 लाख पगाराची सरकारी नोकरी ! CPCB भरतीसाठी अर्ज करण्याची संधी गमावू नका

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात (CPCB) 60 हून अधिक सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२५ आहे, चला, जाणून घेऊया या भरतीचं महत्त्व आणि अर्ज करण्याची अचूक पद्धत, जेणेकरून ही सुवर्णसंधी हातून निसटणार नाही!

₹1.77 लाख पगाराची सरकारी नोकरी ! CPCB भरतीसाठी अर्ज करण्याची संधी गमावू नका
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 3:10 PM

सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक भन्नाट बातमी आहे! केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात (CPCB) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल ६० पेक्षा जास्त पदं भरली जाणार आहेत आणि निवड झाल्यावर काही पदांसाठी महिन्याला ₹1,77,500 पर्यंत पगार मिळू शकतो!

कसली आहे ही भरती?

CPCB ही भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी संस्था आहे. देशभरात पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या या संस्थेत सध्या Group A, B आणि C या स्तरांवरील पदांसाठी भरती सुरू आहे.

कोण अर्ज करू शकतो?

पात्रता पदानुसार वेगळी असली तरी, अगदी दहावी-बारावी पास उमेदवारांपासून ते इंजिनिअरिंग, कायदा, टेक्नॉलॉजी किंवा मास्टर्स डिग्री धारकांपर्यंत सर्वांसाठी संधी आहे!

वयोमर्यादा: 18 – 25 वर्ष

निवड प्रक्रिया कशी होईल?

उमेदवारांची निवड ही खालील पद्धतीने होईल:

1. लेखी परीक्षा
2. कौशल्य चाचणी (Skill Test)
3. कागदपत्रांची पडताळणी
4. वैद्यकीय तपासणी

पगार किती असेल?

पद आणि पात्रतेनुसार ₹18,000 ते ₹1,77,500 पर्यंत महिना पगार मिळू शकतो! सरकारी नोकरीसोबत स्थिर करिअर आणि उत्तम वेतनाची ही एक उत्तम संधी आहे.

अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.

CPCB ची अधिकृत वेबसाइट: cpcb.nic.in

शेवटची तारीख: 28 एप्रिल 2025

अर्ज शुल्क:

सामान्य प्रवर्गासाठी (general) — ₹1000

SC/ST/महिला/माजी सैनिक/दिव्यांग — शून्य शुल्क!

अर्ज करण्याची पद्धत:

1. cpcb.nic.in या वेबसाइटवर जा.

2. ‘Recruitment’ सेक्शनवर क्लीक करा.

3. त्यात जाऊन आपला अकाउंट तयार करा आणि लॉग-इन करा.

4. अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

5. शुल्क भरून अर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढा.