UPSC CDS 2 : उमेदवार अविवाहित असेल तरच अर्ज भरू शकतो ! अनेक पदांवर भरती, भारताचा नागरिक असणं आवश्यक…

| Updated on: May 21, 2022 | 6:09 PM

अर्ज करण्यासाठी उमेदवार अविवाहित असणं आणि तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, इतर नियम आणि अटी यासंदर्भातल्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करावा.

UPSC CDS 2 : उमेदवार अविवाहित असेल तरच अर्ज भरू शकतो ! अनेक पदांवर भरती, भारताचा नागरिक असणं आवश्यक...
अनेक पदांवर भरती, भारताचा नागरिक असणं आवश्यक...
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी आपल्या अधिकृत वेबसाईट (Official Website) वर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती परीक्षेअंतर्गत अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार upsconline.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन (UPSC CDS 2 Application) अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना परीक्षेला बसायचे नाही, त्यांच्यासाठी अर्ज मागे घेण्याची सुविधा यूपीएससीने दिली आहे, हे महत्त्वाचं आहे. अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन (यूपीएससी सीडीएस 2) अर्ज करण्यासाठी उमेदवार अविवाहित असणं आणि तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, इतर नियम आणि अटी यासंदर्भातल्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ न घालवता लवकरात लवकर अर्ज करावा.

यूपीएससी सीडीएस 2 2022 साठी अर्ज कसा करावा

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज 18 मे 2022 पासून सुरु झालाय. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. 14 जून 2022 ते 20 जून 2022 या कालावधीत तुम्ही संध्याकाळी वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज मागे घेऊ शकता. प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख (संभाव्य) 1 ऑगस्ट 2022 आहे. यूपीएससी सीडीएस 2 2022 परीक्षेची तारीख – 4 सप्टेंबर 2022

अर्ज शुल्क

  1. सर्वसाधारण (Open) प्रवर्गातील उमेदवार – 200 रुपये
  2. ओबीसी (OBC) प्रवर्ग उमेदवार – 200 रुपये
  3. एससी-एसटी (SC/ST) आणि महिला (Women) उमेदवारांना –  शुल्क नाही.

यूपीएससी सीडीएस 2022 : किती पदं रिक्त

  • इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) – 100
  • भारतीय नौदल अकादमी (INA) – 22
  • वायुसेना – 32
  • अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA ) – 169
  • कार्यालयीन प्रशिक्षण अकादमी (OTA) महिला – 169

अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in

टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.