
पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन ऑईलच्या पाईपलाइन विभागात २०२६ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentice) एकूण ३९४ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. यावेळी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या गुणवत्तेवर (Merit Basis) केली जाणार आहे.
इंडियन ऑईलच्या पाईपलाइन विभागात असलेली ही भरती देशातील विविध विभागांतर्गत केली जात आहे. ही भरती इंडियन ऑइलच्या पाइपलाइन्स विभागांतर्गत पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा चारही विभागांत केली जात आहे. यामध्ये पश्चिम विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून, त्याखालोखाल पूर्व, उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये एकूण ३९४ अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. यात महाराष्ट्र राज्याचा समावेश पश्चिम विभाग पाईपलाईन्स (WRPL) मध्ये करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर या तीन ठिकाणी एकूण १२ शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार जाईल. तर संपूर्ण पश्चिम विभागात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचा या ठिकाणी एकूण १३६ जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत तांत्रिक आणि बिगर तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे
या अर्जदाराचे वय ३१ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC (NCL) उमेदवारांना ३ वर्षांची वयात सवलत दिली जाईल. सर्व उमेदवारांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपली शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्रथम ट्रेडनुसार NATS (https://nats.education.gov.in/) किंवा NAPS (https://www.apprenticeshipindia.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन ऑइलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा.
निवड झालेल्या उमेदवारांना १२ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान नियमानुसार मासिक विद्यावेतन (Stipend) देखील दिले जाणार आहे.