IRCTC Recruitment 2021: आयआरसीटीसीमध्ये अप्रेंटिसची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी

| Updated on: Sep 18, 2021 | 3:19 PM

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोर्शेन म्हणजेच आयआरसीटीसीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

IRCTC Recruitment  2021: आयआरसीटीसीमध्ये अप्रेंटिसची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी
job
Follow us on

नवी दिल्ली: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोर्शेन म्हणजेच आयआरसीटीसीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आयआरसीटीसीनं कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांच्या 100 जागांवर अर्ज मागवले आहेत. दहावी पास उत्तीर्ण विद्यार्थी देखील या अप्रेंटिससाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी ?

जे उमेदवार आयरआसीटीसीमध्ये अप्रेटिंस करु इच्छितात ते सविस्तर नोटिफिकेशन वाचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकतात. apprenticeshipindia.org या वेबसाईटवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

आयआरसीटीसीमध्ये अप्रेंटिस करणाऱ्या उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण ही किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. दहावी किंवा समकक्ष मान्यताप्राप्त बोर्डातून परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. उच्च शिक्षित विद्यार्थी देखील अर्ज करु शकतील, अशी माहिती आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात वैयक्तिक माहिती, नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती भरावी लागेल. apprenticeshipinida.org या वेबसाईठवर उमेदवारांना त्यांचं लॉगीन तयार करावं लागेल. लॉगीन आयडी तयार केल्यावर उमेदवार अर्ज सादर करु शकतात. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 500 तासांचं प्रशिक्षण दिलं जाईल. उमेदवारांना 12 महिने अप्रेंटिस करता येणार आहे.

अप्रेंटिसमध्ये स्टायपेंड किती मिळणार?

आयआरसीटीसीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणून निवड होणाऱ्या उमेदवारांन दरमहा 7 हजार ते 9 हजार इतका स्टायपेंड दिला जाईल. आठवड्यातून एक दिवस सुट्टी देखील त्यांना दिली जाणार आहे.

एफकॅटच्या दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर

भारतीय हवाई दलाने (IAF) AFCAT 2 2021 चा निकाल जाहीर केला आहे. एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टचा दुसऱ्या फेरीचा निकाल अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला होता ते या वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. ही परीक्षा 28, 29 आणि 30 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली होती. AFCAT 2 2021 च्या निकालात उमेदवारांची पात्रता स्थिती आणि गुणांचा समावेश आहे. जे उमेदवार AFCAT 2 2021 ची परीक्षा उत्तीर्ण झालेत ते AFSB मध्ये उपस्थित होण्यास पात्र झाले आहेत. एएफएसबी हा 5 दिवसांचा कार्यक्रम असेल जिथे उमेदवारांना ग्रुप वर्क, पीपीडीटी (पिक्चर परसेप्शन अँड डिस्कशन टेस्ट), पीएबीटी आणि मानसशास्त्रीय चाचणी, मुलाखत आणि जीटीओ यांना सामोरं जावं लागेल. यानंतर त्यांची निवड केली जाईल.

इतर बातम्या:

Maharashtra SET 2021 Admit Card : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षा

IAF AFCAT 2 2021 Result : एफकॅटच्या दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर तपासा

JEE Main 2021 Result : BArch आणि B Planning साठी निकाल लवकरच जाहीर होणार; अशा प्रकारे तपासा

IRCTC Recruitment 2021 invited Applications for 100 posts computer operator and programming assistant ssc pass candidate can apply