JK Bank Banking Associate Result 2021: जम्मू काश्मीर बँक असोसिएट भरती परीक्षेचा निकाल जाहीर, jkbank.com वर पाहा निकाल

| Updated on: Mar 28, 2021 | 10:36 AM

जम्मू काश्मीर बँकेने असोसिएट भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. , jkbank.com वर निकाल पाहता येणार आहे.

JK Bank Banking Associate Result 2021: जम्मू काश्मीर बँक असोसिएट भरती परीक्षेचा निकाल जाहीर, jkbank.com वर पाहा निकाल
Student
Follow us on

JK Bank Banking Associate Result 2021नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर बँकेने बँकिंग असोसिएट पदासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली असेल, ते jkbank.com या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. जम्मू आणि काश्मीर बँकेमार्फत ऑनलाईन परीक्षा 1 ते 31 जानेवारीदरम्यान विविधा तारखांना झाली होती. उमेदवारांना निकाल 27 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान डाऊनलोड करता येणार आहे. (JK Bank Banking Associate Result 2021 declared check direct link jkbank.com for download)

JK Bank Banking Associate Result पाहण्यासाठी थेट लिंक

इथे पाहा निकाल

निकाल कसा पाहणार

स्टेप 1: प्रथम जम्मू काश्मीर बँकेच्या वेबसाईटवर जावा
स्टेप 2 :Career सेक्शनवर क्लिक करा
स्टेप 3: पुढील पेजवर JKBANK BANKING ASSOCIATE RESULT ही लिंक दिसेल त्यावर क्लिक करा
स्टेप 4 :यानंतर नवीन पेज ओपन होईल.
स्टेप 5 :तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा
स्टेप 6 :JK Bank Result 2020 निकाल डाऊनलोड करा.

जम्मू काश्मीर बँकेची पुढील प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. बँकिंग असोसिएट परीक्षेत यशस्वी झालेल्या उमदेवारांना 8 एप्रिलला पुढील माहिती कळवली जाणार आहे. बँकेच्या शाखेमध्ये 5 एप्रिल ते 9 एप्रिलच्या काळात यशस्वी उमेदवारांनी ओळखपत्र दाखवल्यास तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, डोमासाईल, याशिवाय इतर महत्वाची कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. बँकेच्या जम्मू आणि श्रीनगर येथील प्रमुख कार्यालयामध्ये कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा

RBI ची मोठी कारवाई, लातूरमधील दोन सहकारी बँकांना दंड

(JK Bank Banking Associate Result 2021 declared check direct link jkbank.com for download)