Maharashtra Board SSC Results 2022 Today: धकधक धकधक? पोरांनो, आज दहावीचा निकाल! फक्त एकच क्लिक आणि निकाल हातात

| Updated on: Jun 17, 2022 | 1:31 PM

Maharashtra Board SSC exam Results 2022 Today at 1 pm:

Maharashtra Board SSC Results 2022 Today: धकधक धकधक? पोरांनो, आज दहावीचा निकाल! फक्त एकच क्लिक आणि निकाल हातात
फक्त एकच क्लिक आणि निकाल हातात
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

मुंबई: SSC निकाल (SSC Result 2022) जाहीर होण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांनो तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड जवळच ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. आज दुपारी 1 वाजता रिझल्ट लागणार. निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती ही त्या ॲडमिट कार्डमध्ये आहे. राज्यातील मंत्री पत्रकार परिषद घेऊन SSCच्या विद्यार्थ्यांची (SSC Students) उत्तीर्णतेची टक्केवारी, टॉपर्स लिस्ट आणि जिल्हानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी जाहीर करणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. यावर्षी दहावीच्या परीक्षेला (SSC Examination) 16,38,964 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 8,89,505 मुले आणि 7,49,458 मुली या परीक्षेसाठी बसल्या होत्या.

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला होता. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या, जवळपास 16 लाख विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत. तुम्हाला आज दुपारी जाहीर होणारा निकाल एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी tv9मराठीने खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही आपला निकाल सर्वात जलद tv9marathi.com वर पाहू शकता.

फक्त एका क्लिकवर निकाल हातात

  1. दुपारी 1 वाजता निकाल लागला की तुम्ही लगेच TV9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या
  2. या लिंकवर क्लिक करा
  3. हे सुद्धा वाचा
  4. तुम्हाला समोर एक बॉक्स दिसेल
  5. या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे
  6. आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  7. यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल
  8. डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि निकाल डाऊनलोड करा.
  9. प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा, निकालाची प्रिंट काढून घ्या आणि पुढील वापरासाठी जवळ ठेवा.

विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

या संदर्भातली माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली होती. मार्च-एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं होतं, त्यांनी ट्विटरवर यासंदर्भातला एक व्हिडिओच जारी केला होता. याचबरोबर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा देखील दिल्या.

इथे तपासा दहावीचा निकाल :

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

वाचा दहावीच्या निकालाचे ताजे आणि वेगवान अपडेट्स :

https://www.tv9marathi.com/career/ssc-result-2022-maharashtra-board-nikal-live-updates-check-msbshse-board-class-10th-exam-results-news-online-at-mahresult-nic-in-dahavi-toppers-paas-percentage-news-today-au136-736831.html

एक क्लिक करा, निकाल मिळवा!

इथे क्लिक करा

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला होता. 2021च्या दहावी परीक्षेत साधारण 15.74 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.