Government Job : आधी ते हातातलं काम सोडा आणि हा अर्ज भरा ! सरकारी नोकरी, चांगला पगार, उद्याच शेवटची तारीख !

पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडे फक्त एकच दिवस शिल्लक आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 2 मे 2022 आहे. लवकरात लवकर अर्ज करा. रबर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. एकूण ३४ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Government Job : आधी ते हातातलं काम सोडा आणि हा अर्ज भरा ! सरकारी नोकरी, चांगला पगार, उद्याच शेवटची तारीख !
सरकारी नोकरी, चांगला पगार, उद्याच शेवटची तारीख !
| Updated on: May 01, 2022 | 1:45 PM

सरकारी नोकरीची (Government Jobs) तयारी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी (News)आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत रबर बोर्डमध्ये भरती प्रक्रिया (Rubber Board Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. रबर बोर्ड कंपनीने अनेक जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडे फक्त एकच दिवस शिल्लक आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 2 मे 2022 आहे. लवकरात लवकर अर्ज करा. रबर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. एकूण 34 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांना 34 हजारांपेक्षा जास्त पगार मिळणार आहे. या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा गुवाहाटी / आगारताळया ठिकाणी घेण्यात येईल. निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती ईशान्य भारतात म्हणजेच आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये असलेल्या कार्यालयात केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी/ संबंधित विषय/ वनस्पतीशास्त्र विषयात बॅचलर डिग्री

एकूण रिक्त जागा आणि त्यांचं वर्गीकरण

एकूण जागा – 34

जनरल – 11 जागा

ओबीसी – ७ जागा

एससी – 11 जागा

एसटी – 2 जागा

ईडब्ल्यूएस – 3 जागा

अधिकृत वेबसाईट

Click Here

वेतन

उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 6 ( पूर्व सुधारित रु. 9,300 – 34,800 (पीबी 2) ग्रेड पे रु. 4,200/- ) अंतर्गत वेतन