
ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड Nothing चा उप-ब्रँड CMF सध्या भारतात मोठी घडामोड करत आहे. कंपनीने आपल्या ग्लोबल मार्केटिंग ऑपरेशन्स भारतात, विशेषतः गुरुग्राममध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून, सोशल मीडिया कंटेंट प्रोड्यूसरपासून ते मार्केटिंग मॅनेजरपर्यंत अनेक संधी खुल्या करण्यात आल्या आहेत.
Nothing चे सह-संस्थापक अकिस इवेंजेलिडिस यांनी या गोष्टीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, “भारत हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं मार्केट आहे. त्यामुळेच आम्ही आमचं संपूर्ण ग्लोबल मार्केटिंग ऑपरेशन येथे हलवत आहोत.” कंपनीने ही भरती सुरू करताच https://careers.nothing.tech/ या लिंकवर विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
सध्या CMF कडून खालील पदांसाठी भरती सुरू आहे:
* प्रोजेक्ट मॅनेजर
* PR मॅनेजर
* सोशल मीडिया कंटेंट प्रोड्यूसर
* मार्केटिंग मॅनेजर
* ग्लोबल सोशल मीडिया मॅनेजर
* ग्लोबल प्रोडक्ट मार्केटिंग लीड
* कम्युनिटी मॅनेजमेंट असोसिएट
* ग्लोबल प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर (स्मार्टफोन्स आणि स्मार्ट प्रॉडक्ट्स)
सध्या भारतातील तामिळनाडूमध्ये Nothing आणि CMF चे प्रॉडक्ट्स असेंबल केले जात आहेत. यामध्ये सरकारच्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनांचा (PLI Scheme) लाभ घेतला जात आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळते. केवळ Nothing नव्हे, तर Apple सारख्या कंपन्याही भारताकडे ‘प्रोडक्शन बेस’ म्हणून पाहत आहेत. यावर्षीच्या सुरुवातीला Apple ने भारतात iPhone उत्पादन वाढवण्याची घोषणा केली होती.
Nothing ने नुकताच आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘Nothing Phone 3’ सादर केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महागडा स्मार्टफोन मानला जात आहे. ‘Nothing Phone 2’ चा हा उत्तराधिकारी 15 जुलैपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
भारत सरकारच्या ‘Make in India’ उपक्रमाला पूरक ठरणाऱ्या अशा आंतरराष्ट्रीय कंपन्या आता भारतातच आपलं मार्केटिंग आणि प्रॉडक्शन ऑपरेशन्स शिफ्ट करत आहेत. त्यामुळे तरुणांसाठी नवीन नोकऱ्यांचे दरवाजे खुले होत आहेत. टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि मिडिया क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर Nothing आणि CMF कडून सध्या उपलब्ध असलेल्या या संधी नक्कीच महत्त्वाच्या आहेत.