
अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या मालकीची प्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनी टेस्लाने भारतात आता तरुण विद्यार्थी आणि करियरची सुरुवात करणाऱ्या तरुणांना नोकरीची मोठी संधी आणली आहे. टेस्ला कंपनीने भारताच्या अनेक शहरात इंटर्नशिपची संधी आणली आहे. लिंक्डइन (LinkedIn) वर केलेल्या जाहिरातीनुसार टेस्ला आता भारतात सेल्स ट्रेनी / इंटर्न पदासाठी अर्ज स्वीकारत आहे. भारतात टेस्लाचा विस्तार करण्याचे हे मोठे पाऊल आहे.इंडस्ट्रीतील तज्ज्ञाच्या मते ही चांगली संधी म्हटली जात आहे.अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीसोबत काम करण्याची मोठी संधी तरुणांना मिळणार आहे.
टेस्ला कंपनीने इंटर्नशिपसाठी भारतातील ८ प्रमुख शहरांची निवड केली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळणार आहे.
कोणती आहे ही शहरे ?
मुंबई
नई दिल्ली
गुरुग्राम
हैदराबाद
चेन्नई
बंगलूरू
पुणे
अहमदाबाद
बहुतांशी इंटर्नशिपमध्ये केवळ सहायकाचे काम असते. परंतू टेस्लाच्या या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला कस्टमर सर्व्हीसचा ‘रिअल वर्ल्ड’ अनुभव देण्यात येणार आहे. जॉब पोस्टींगनुसार इंटर्न्सची मुख्य जबाबदारी या प्रकारे असणार आहे.
ब्रँड एडव्होकेट बनने: ग्राहकांना टेस्लाच्या कार, त्यांचे मिशन आणि नव्या तंत्रज्ञानासंदर्भात विस्ताराने माहिती देणे
कस्टमर प्रोफाईलिंग: ग्राहकांशी संवाद साधणे आणि त्यांची पसंद आणि प्राथमिकतेला समजून घेणे
टेस्ट ड्राईव्ह को-ऑर्डिनेशन: ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हचा अनुभव देणे आणि या प्रक्रियेला मॅनेज करणे
सेल्स सपोर्ट: डाटाबेसला अपडेट ठेवणे, म्हणजे लोकल टीम ग्राहकांना विनाव्यत्यय चांगली सर्व्हीस देऊ शकेल.
थोडक्यात ही केवळ पुस्तकी प्रशिक्षण नसणार तर टेस्ला ग्लोबल स्टँण्डर्डच्या हिशेबाने काम करण्याचा वास्तविक अनुभव आहे.
टेस्लाने या इंटर्नशिपसाठी काही खास योग्यता निश्चित केल्या आहेत:
कम्युनिकेशन स्किल्स: तुम्हाला संवाद साधण्याची चांगली कला यायला हवी आणि कस्टमर सर्व्हीसमध्ये तुम्हाला रस असायला हवा.
ड्राईव्हींग लायसन्स: या कामात टेस्ट ड्राईव्हच्या कामाचाही समावेश आहे. त्यामुळे तुमच्याकडे वैध ड्रायव्हींग लायसन्स आणि तुमचा रेकॉर्ड चांगला असायला हवे.
अनुभव: मागच्या कामाचा अनुभव असणे गरजेचे नाही. टेस्ला तुमचा एटीट्यूड, टेक्नोलॉजीमधील रस आणि प्रोफेशनलिझ्मला जास्त महत्व देत आहे.
इच्छुक विद्यार्थी आणि उमेदवार टेस्लाच्या ऑफिशियल लिंक्डईन पेज वा टेस्लाच्या वेबसाईटच्या ‘Career’ सेक्शनवर जाऊन अर्ज करु शकतात.अर्ज करण्याआधी तुमच्या रेज्युमे ( बायोडेटा ) अपडेट करणे विसरु नये आणि त्यात तुमची कस्टमर सर्व्हीस वा तांत्रिक स्किल्सला अवश्य हायलाईट करावे.