BMC Jobs: नोकरी करो तो ही पैसा डबल, नो शॉर्ट कट! मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा, त्वरा करा एक जागा मिळवा

| Updated on: Jun 11, 2022 | 11:31 AM

वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अर्ज करायची शेवटची तारीख या सगळ्याची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. पदवीधर असणं आवश्यक आहे.

BMC Jobs: नोकरी करो तो ही पैसा डबल, नो शॉर्ट कट! मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा, त्वरा करा एक जागा मिळवा
मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करण्याची उत्तम संधी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई: नोकरीसाठी (Jobs) इच्छुक असणाऱ्यांना ही सुवर्णसंधी आहे! मुंबई महानगरपालिकेमध्ये काम (BMC Jobs) करण्याची उत्तम संधी मिळणारे. या नोकरीसाठीचं नोटिफिकेशन मुंबई महानगपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. कम्युनिटी ऑर्गनायझर या पदासाठीच्या या रिक्त जागा आहेत. अर्ज करायची पद्धत ऑफलाईन असून नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अर्ज करायची शेवटची तारीख या सगळ्याची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. पदवीधर असणं आवश्यक आहे. वयाची अट आणि इतर अटी जरी असल्या तरी आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार योग्य त्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये दर महिन्याला पगार (Salary) असणार आहे. एकूण पदांची संख्या 113 आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षणसंस्थेतून उमेदवार पदवीधर असावा (सविस्तर माहिती खाली दिलेली आहे).

पदाचं नाव

मुंबई पालिकेत कम्युनिटी ऑर्गनायझर

शैक्षणिक पात्रता

  • कोणतीही पदवी
  • समाजशास्त्र किंवा समाजकार्य विषयातील पदवीधरास प्राधान्य
  • सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान 2 वर्षे कामाचा अनुभव
  • मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक, प्राधान्य दिलं जाईल ( मराठी, इंग्रजी टंकलेखनाचे प्रतिशब्द 30 अनुक्रमे )
  • एस.एस.सी.आय.टी (MSCIT) परीक्षा शासन नियमाप्रमाणे उत्तीर्ण असणं आवश्यक
  • एम.एस.ऑफिस (MS Office), पॉवर पॉईंट (Power Point), वर्ड (Word), एक्सेल (Excel) यांचं ज्ञान असणं आवश्यक

वयाची अट

  • खुला वर्ग – वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे
  • आरक्षित वर्ग- 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा (सरकारी नियमानुसार सवलत)

अर्ज पाठवताना सोबत काय जोडावे?

  • रेझुमे (Resume)
  • दहावी, बारावी, शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखल (School Leaving Certificate)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय वर्गासाठी)
  • लायसन्स, आधारकार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो

अर्ज पाठवायची शेवटची तारीख

28 जून 2022

हे सुद्धा वाचा

अर्ज पाठवायचा पत्ता

सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028

टीप: अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या