
गेल्या काही महिन्यांपासून पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. अशातच आता झारखंडमधील पलामू येथे धक्कादायक घटना घडली आहे. दीड महिन्यांपूर्वी एका तरुणीचे लग्न झाले होते. त्याने मोठ्या वाजत गाजत पत्नीला घरी आणले होते. मात्र जिने त्याच्यासोबत सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली आहे तीच त्याचा जीव घेईल हे त्याला माहिती नव्हते. त्यामुळे त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा काढल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, या नवविवाहित वधूला तिचा पती आवडत नव्हता. तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते. याची वराला माहिती नव्हती. मात्र कुटुंबातील लोकांनी टाकलेल्या दबावामुळे वधूने लग्न केले होते. मात्र तिला तिच्या प्रियकराशी लग्न करायचे होते. त्यामुळे लग्नानंतर लगेच मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीला मारण्याचा कट रचला आणि 31 जुलै रोजी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली.
दीड महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
या घटनेबाबत पालमूच्या पोलिस अधीक्षक रेश्मा रमेशन यांनी म्हटले की, मुलगी पलामूच्या जवळील सिंजोनची रहिवासी आहे. 22 जून रोजी तिचे लग्न सरफराज सोबत झाले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर दोघेही वेगळे राहु लागले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी पत्नीने पती सरफराजला जंगलात बोलावले होते. त्यामुळे सरफराज तिला भेटण्यासाठी जंगलात गेला. त्यावेळी आरोपी पत्नीचा प्रियकरही तिथे होता. या दोघांनी दगडानी ठेचून सरफराजला ठार मारले.
फरार प्रियकराचा शोध सुरू
सरफराजच्या हत्येनंतर आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. एसपी रेश्मा रमेशन म्हणाल्या की, ‘या अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. सरफजार हा लातेहार जिल्ह्यातील मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील दही या गावातील रहिवासी होती. यो दोघांनी जंगलात त्याची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पानांनी झाकून टाकला. आरोपी मुलीने प्रियकराशी लग्न करायचे आहे आणि त्यामुळे पतीला मारण्याचा कट रचला अशी माहिती दिली आहे. पोलिसा आता आरोपी मुलीच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. आरोपी प्रियकराला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.