AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैयारा पाहून आले… थिएटरबाहेर 2 तरूण एकमेकांशी भिडले, कारण काय ?

Fight After Watching Saiyaara : 'सैयारा' हा बॉलिवूड चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. मध्य प्रदेशातील मोठ्या संख्येने तरुण हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. मात्र ग्वाल्हेरमध्ये 'सैयारा' चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहाबाहेर दोन तरूणांमध्ये जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

सैयारा पाहून आले... थिएटरबाहेर 2 तरूण एकमेकांशी भिडले, कारण काय ?
सैयारा चित्रपट पाहिल्यावर दोन तरूणांमध्ये मारामारीImage Credit source: social media
| Updated on: Jul 25, 2025 | 10:39 AM
Share

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘सैयारा’ हा बॉलिवूड चित्रपट मोठ्या पडद्यावर धूमाकूळ घालत असून त्याने बक्कळ कमाई केली आहे . अवघ्या आठवड्याभरातच या चित्रपटाने 165.46 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, या चित्रपटाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोक थिएटरमध्ये बेशुद्ध पडत असल्याच्या अनेक बातम्यादेखील समोर आल्या आहेत. आता याच दरम्यान अशी एक वेगळीच बातमी समोर आली आहे, ज्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खरंतर, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये, सैयारा हा चित्रपट पाहिल्यानंतर दोन मुलांमध्ये गर्लफ्रेंडवरून भांडण झाले. सिनेमा हॉलबाहेर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलवर दोन मुलांमधील भांडणाचा व्हिडिओ बनवला. नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ग्वाल्हेरच्या पाडाव पोलीस स्टेशन परिसरातील डीबी मॉलच्या सिनेमा हॉलमध्ये ‘सैयारा’ हा चित्रपट पाहण्यासाठी हे तरुण पोहोचले होते, असे सांगण्यात येत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर, ते तरुण सिनेमा हॉलमधून बाहेर पडले असतानाच त्यांच्यात गर्लफ्रेंडवरून वाद झाला.

जोरदार झाली लाथाबुक्की

मात्र पाहता पाहता हा वाद इतका वाढला की दोघांनीही सिनेमा हॉलबाहेर एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. कधी एक दुसऱ्याला जमिनीवर फेकायचा तर कधी दुसरा पहिल्या तरूणाला मारायचा. दोघांमधील भांडण पाहण्यासाठी तिथे मोठी गर्दी जमली होती. एवढंच नव्हे तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हाणामारीचा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. नंतर तो त्याने सोशल मीडियावर अपलोड केला.

पोलिसांत तक्रार नाही

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मारहाणीच्या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, दोन्ही तरुण रागाच्या भरात एकमेकांवर हल्ला करत आहेत आणि एकमेकांना जोरदार ठोसे मारत आहेत, काही लोक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात पण दोघेही काहीच ऐकण्याचं किंवा शांत होण्याचं नाव घेत नाहीत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने लिहिले – सैयाराचा दुष्परिणाम. दुसऱ्या युजरने लिहिले – भावा, गर्लफ्रेंड कुठे आहे? ही मुलं कसला मूर्खपणा करत आहेत, तेही मुलीसाठी अशी कमेंटही एकाने लिहीली आहे.

त्याचवेळी, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोक प्रतिक्रिया देखील देत आहेत. एकाने लिहिले – सैयाराचा दुष्परिणाम. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – प्रेयसी भाऊ कुठे आहे? दुसऱ्याने लिहिले – हे मुलं कसला मूर्खपणा करत आहेत. तेही मुलीसाठी.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.