फ्लॅटमध्ये सापडला तरूणीचा मृतदेह, बॉयफ्रेंड मात्र फरार, पोलिसांना हत्येचा संशय

एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली.

फ्लॅटमध्ये सापडला तरूणीचा मृतदेह, बॉयफ्रेंड मात्र फरार, पोलिसांना हत्येचा संशय
| Updated on: Jun 07, 2023 | 1:22 PM

बंगळुरू : शहरातील एका आयटी कंपनीत (IT company)काम करणारी 23 वर्षीय तरूणी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून, मृत तरूणीचा मित्र फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. त्राचा शोध सुरू केला असून तो फरार आहे.

पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा असे मृत तरूणीचे नाव असून तिच्यासोबत राहणारी मैत्रिण सोमवारी फ्लॅटवर परतली तेव्हा तिला आकांक्षा मृतावस्थेत आढळून आली. हे पाहून हादरलेल्या मैत्रिणीने तातडीने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. आत्महत्येचे वृत्त कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आकांक्षा पलंगावर मृतावस्थेत पडली होती आणि तिच्या गळ्यात ओढणी बांधलेली होती.

आकांक्षाचा मित्र अर्पित गुरिजला हा सोमवारी तिला भेटायला आला होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर अर्पित हा फरार झाला असून त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. अर्पित आणि आकांक्षा हैदराबादमध्ये एकत्र काम करायचे. आकांक्षा नुकतीच बंगळुरूला आली होती.