अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या महिलेला ठाण्याच्या भामट्याने 85 लाखांना गंडवल, तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले…

वडेरा या महिलेची २०१६ मध्ये नाशिकमधल्या एका नामांकित व्यक्तीशी असलेल्या ओळखीतून त्यांचा संशयित क्रिपलानी यांच्याशी परिचय झाला होता.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या महिलेला ठाण्याच्या भामट्याने 85 लाखांना गंडवल, तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 24, 2022 | 4:59 PM

Crime News : ठाण्यातील एका ठकसेनाने मूळच्या नाशिकमधील (Nashik) असलेल्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये स्थित असलेल्या एका महिलेला तब्बल 85 लाखांना गंडा घातला (Crime News) आहे. नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस (Gangapur Police Station) ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक्स्पोर्ट व्यवसायात गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा देतो असं सांगत एका जमिनीचे खोटे कागदपत्रे संशयिताने या महिलेला दिले होते. काही महिन्यांनी महिलेला आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर गंगापूर रोड पोलिसांत रुपचंद क्रिपलानी याच्याविरुद्ध गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या उदयनगर परिसरात राहणाऱ्या स्मिता संदीप वडेरा यांचा बंगला आहे.

त्यांचे पती हे अमेरिकेत राहतात, तिथे ते सॉफ्टवेअर इंजिनियर असून वडेरा या काही कामानिमित्ताने नाशिकमध्ये येत राहतात.

वडेरा या महिलेची २०१६ मध्ये नाशिकमधल्या एका नामांकित व्यक्तीशी असलेल्या ओळखीतून त्यांचा संशयित क्रिपलानी यांच्याशी परिचय झाला होता.

त्यानंतर क्रिपलानी यांनी एक्स्पोर्ट व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो अशी माहिती क्रिपलानी यांनी वडेरा यांनी दिली होती.

त्याप्रमाणे वडेरा यांनी क्रिपलानी यांना टप्प्याटप्प्याने तब्बल ८५ लाख रुपये दिले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

क्रिपलानी याने पैसे परत करण्याऐवजी ठाणे जिल्ह्यातील उत्थन येथील एक शेत जमीन स्वत:ची असल्याचे भासवून वडेरा यांना जमीन देण्याचे आश्वासित केले होते.

एक एकर चार गुंठे शेत जमीनाच्या हिस्स्याचे १३ फेब्रुवारी २०२१ मध्ये संशयिताने लेटर ऑफ द कमिटमेंट हे सुद्धा बनावट पद्धतीने करून दिले होते.
विशेष म्हणजे या सर्व बनावट कागदपत्रांची खोटी दस्तनोंदणीही देखील करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

वडेरा यांनी अधिक चौकशी केल्यावर हे दस्त खोटे असल्याचे उघड झाले असून गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी याबाबत तपास सुरू केला आहे.