नापास झाले म्हणून चक्क शिक्षकांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी दिली शिक्षा

| Updated on: Sep 01, 2022 | 2:29 AM

एकूण 36 विद्यार्थी नववीच्या प्रॅक्टीकल परीक्षेला बसले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी नापास झाले. सोमवारी गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकासह शाळेतील दोघा कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी पकडलं आणि झाडालं बांधलं. यानंतर मारहाण केली गेली.

नापास झाले म्हणून चक्क शिक्षकांनाच झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी दिली शिक्षा
धक्कादायक प्रकार...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

तुम्ही नववीत (9th Standard Student) असताना कधी नापास झाला आहात का? झाला असेल तर मग त्यासाठी तुम्ही दोष कुणाला दिला? 99.99 टक्के लोकांनी स्वतःलाच दिला असे. 0.1 टक्के लोकं देवालाही दोष देऊ शकतात. पण चुकूनही शिक्षकांना दोष दिलाय का? नापास झालो म्हणून शिक्षकांना (School Teachers) दोष देणारे विद्यार्थी मिळणं दुर्मिळच. म्हणूनच नापास झाले म्हणून शिक्षकांना दोष देणाऱ्या विद्यार्थ्यांची बातमी झाली नाही तरच नवलं. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांना दोषच दिला नाही, तर त्यांना चक्क झाडाला बांधलं. त्यानंतर त्यांना शिक्षा म्हणून मारहाणही केली. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होऊ लागलाय. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियातली वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्यात. नेमकी घटना घडली कुठे, यामागची गोष्ट काय आहे, हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडीओमध्ये तिघांना झाडाला बांधण्यात आल्याचं दिसतंय. काही विद्यार्थी या शिक्षकांशी बाचाबाची करत आहेत. दोघा विद्यार्थ्यांच्या हातात एक दांडकंही दिसतंय. ते विद्यार्थी हातात दंदुका घेऊन झाला गोल गोल फेऱ्या मारत असल्याचं दिसतं. तर गणवेशातील इतर विद्यार्थी या ठिकाणी गोळा झालेत. याती काही विद्यार्थी सदर घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसलेत.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय प्रकरण?

झारखंडमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना मारहाण केली. या मारहाणीचं कारण जेव्हा समोर आलं, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. परीक्षेत नापास झाल्यामुळे शिक्षकांना मारहाण करण्यात आली असल्याचं वृत्त ANI वृत्त संस्थेनं दिलं आहे.

मारहाण करण्याआधी या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी एका छाडालाही बांधलं होतं. त्यानंतर त्यांना मारलं. हे सगळे विद्यार्थी नववीतील असल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील ही घटना सध्या सोशल मीडियात चर्चेत आलीय.

एकूण 36 विद्यार्थी नववीच्या प्रॅक्टीकल परीक्षेला बसले होते. त्यापैकी 11 विद्यार्थी नापास झाले. सोमवारी गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकासह शाळेतील दोघा कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी पकडलं आणि झाडालं बांधलं. यानंतर मारहाण केली गेली. यात शिक्षक कुमार सुमन जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.