Amaravati Murder : अमरावतीत 17 वर्षीय मुलाला चाकूने भोसकले, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात खळबळ

विकासवर एकूण सात वार करण्यात आले. यापैकी चार वार छातीत करण्यात आले. यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले.

Amaravati Murder : अमरावतीत 17 वर्षीय मुलाला चाकूने भोसकले, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात खळबळ
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 12:59 AM

अमरावती : एका 17 वर्षीय मुलाची चाकू (Knife)ने भोसकून हत्या (Murder) केल्याची घटना अमरावती शहरात घडली आहे. विकास गायकवाड असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. अमरावतीतील के. एल. कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. हत्येमागचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचाही शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकले

विकास गायकवाड हा भीमनगर येथील रहिवासी होता. के. एल. कॉलेज समोर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. विकासवर एकूण सात वार करण्यात आले. यापैकी चार वार छातीत करण्यात आले. यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. मात्र विकासची हत्या नेमकी कोणत्या कारणावरुन करण्यात हे अनभिज्ञ आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गाडगे नगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीच्या डोक्यात दगड घातला

चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. महेश पंडित चौगुले (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. मयत तरुणी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी होते. तसेच एकाच ठिकाणी कामाला होते. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. मात्र आरोपी प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातूनच त्याने डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. (A 17-year-old boy was stabbed to death in Amravati)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.