AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : नागपूरमध्ये घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी अटक, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त

या टोळीने 26 जून रोजी नागपुरात चार ते पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. पोलिसांनी आरोपींकडून चार वॉकी टॉकी, घराचे कुलूप तोडण्यासाठी हायटेक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मशीन, 6 नंबर प्लेट असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Nagpur Crime : नागपूरमध्ये घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी अटक, आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त
नागपूरमध्ये घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 7:01 PM
Share

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखे (Crime Branch)ने विविध राज्यांमध्ये हायटेक घरफोड्या (Burglary) करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक (Gang Arrest) केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी टॉकी वापरून घरफोड्या करीत असे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या टोळीने 21 घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अनुप सिंग (रा.भोपाळ, मध्य प्रदेश), अभिषेक सिंग (रा. भोपाळ मध्य प्रदेश), अमित ओम प्रकाश सिंग (रा. भोपाळ मध्य प्रदेश) आणि इमरान अलवी (रा. हापोड, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने 26 जून रोजी नागपुरात चार ते पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. पोलिसांनी आरोपींकडून चार वॉकी टॉकी, घराचे कुलूप तोडण्यासाठी हायटेक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मशीन, 6 नंबर प्लेट असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली

नागपूर गुन्हे शाखेचे पथक या घरफोडीच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. यावेळी काही संशयास्पद व्यक्ती कारमध्ये बसून दुसऱ्या राज्यात जात असताना अनेक ठिकाणी कारची नंबर प्लेट बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच आधारावर पोलिसांनी या टोळीचा आणि ते वापरत असलेल्या कारचा शोध सुरू केला. ही टोळी शनिवारी दुपारी काटोल नाक्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. परंतु चारही बाजूने पोलिसांनी घेरल्यानंतर पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. आरोपींना त्यांचा पोलीस शोध घेऊ शकतात. तसेच पोलीस इलेक्ट्रॉनिक सर्विलंसची मदत घेऊन त्यांना शोधू शकतात हे माहीत असल्यामुळे ते गुन्ह्याच्या ठिकाणी मोबाईल वापरत नव्हते. वॉकी टॉकीजच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क करायचे. (An inter state burglary gang was arrested in Nagpur)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.