जेली चॉकलेट खाणे बाळाच्या जीवावर बेतले, श्वास अडकल्याने 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

| Updated on: Jan 27, 2023 | 11:33 PM

चॉकलेट घशात अडकल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी बाळाला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला घोणेसरे येथे नेण्याचा सल्ला दिला.

जेली चॉकलेट खाणे बाळाच्या जीवावर बेतले, श्वास अडकल्याने 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
जेली चॉकलेट खाल्ल्यानंतर बालकाचा मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

गुहागर : चॉकलेट म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाच्याच आवडीची गोष्ट आहे. लहान मुलांमध्ये जेली चॉकलेटची विशेष क्रेझ असते. मात्र हे जेली चॉकलेच एका बालकाच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. जेली चॉकलेट घशात अडकल्याने 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात घडली आहे. गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावातील ही दुदैवी घटना घटना आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तेरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय आहे प्रकरण?

गुहागरमधील साखरीआगर गावात तेरेकर कुटुंबात ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. कुटुंबीयांनी बाळाला जेली चॉकलेट भरवले. मात्र हे चॉकलेट बाळाच्या घशात अडकले.

चॉकलेट घशात अडकल्याने श्वास अडकला

चॉकलेट घशात अडकल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी बाळाला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला घोणेसरे येथे नेण्याचा सल्ला दिला.

दवाखान्यात नेत असतानाच बाळाचा मृत्यू

नातेवाईक घोणेसरे येथे दवाखान्यात बाळाला घेऊन जात असतानाच वाटेत बाळाचा मृत्यू झाला. श्वास घेता न आल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.