मित्रांसोबत शारिरीक संबंध ठेव नाहीतर…, सांस्कृतिक शहरात चाललंय काय?

| Updated on: Mar 14, 2023 | 6:06 PM

एका महिलेने आपल्या मैत्रिणीला फोन करुन घरी येण्यास सांगितले. मैत्रिण घरी येताच महिलेने तिला एक ऑफर दिली. ही ऑफर ऐकताच मैत्रिणीच्या पायाखालची जमीनच सरकली.

मित्रांसोबत शारिरीक संबंध ठेव नाहीतर..., सांस्कृतिक शहरात चाललंय काय?
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Image Credit source: Google
Follow us on

पुणे : पुण्यातील धनकवाडी परिसरात मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनेच आपल्याच मैत्रिणीकडून वेश्याव्यवसाय करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने नकार दिल्यानंतर मित्रांच्या सोबत मिळून तिला मारहाण करण्यात आली. यानंतर महिलेच्या दोघा मित्रांनी पीडितेचा विनयभंग केला. महिलेने कशी बशी स्वतःची सुटका करुन घेत सहकारनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

रात्री 10 वाजता आरोपी महिलेने मैत्रिणीला घरी बोलावले

बालाजी नगर धनकवडी येथे राहणाऱ्या एका महिलेने रात्री 10 वाजता आपल्या एका मैत्रिणीला घरी बोलावले. मैत्रिण घरी गेली तेव्हा तेथे दोन जण आधीच तिथे उपस्थित होते. आरोपी महिला तिच्या मैत्रिणीला म्हणाली, ‘तुला माझ्या दोन्ही मित्रांना आवडली आहे. त्यांच्याशी सेक्स करा. मी तुला त्यांच्याकडून 5 हजार रुपये मिळवून देते.’ एवढेच नाही तर नकार दिल्यास तिला चोरीच्या आरोपात अडकवण्याची धमकीही दिली. तक्रारदार महिला केअर टेकरचे काम करते आणि आरोपी महिला तिची मैत्रिण आहे.

महिलेने प्रस्ताव नाकारताच चोरीचा आरोप केला

शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर नाकारल्यामुळे आरोपी महिलेने तिच्या पुरुष मित्रांसह तिला मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. जेव्हा महिलेने सेक्सचा प्रस्ताव नाकारला आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी महिलेने तिच्या दोन पुरुष मित्रांसह तिच्यावर चोरीचा आरोप केला.

हे सुद्धा वाचा

आरोपी पुरुषांनी महिलेचा विनयभंग केला

दरम्यान, दोन्ही पुरुष आरोपींनी मिळून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या पीडितेने कशीतरी सुटका करून घेतली आणि तेथून बाहेर पडल्यानंतर तिने थेट सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.