AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळावर चार हॉर्नबिल पक्ष्यांच्या तस्करीचा डाव उधळला, AIU ने केली कारवाई

विमानतळावर चार दुर्मिळ जातीच्या हॉर्नबिल पक्ष्यांना सामानात लपवून त्यांची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

विमानतळावर चार हॉर्नबिल पक्ष्यांच्या तस्करीचा डाव उधळला, AIU ने केली कारवाई
hornbill
| Updated on: Oct 22, 2024 | 8:36 PM
Share

मुंबई विमानतळावर अनेकदा सोने किंवा अंमलीपदार्थांची तस्करी करताना अनेक जणांवर कारवाई होत असते. परंतू मुंबई विमानतळावर दोघा प्रवाशांना चार हॉर्नबिल पक्ष्यांची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. हे पक्षी परदेशी असून त्यांच्या तस्करी करण्याचा डाव सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने उधळला आहे. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने या प्रकरणात दोन प्रवाशांना अटक केली आहे. यात एक महिला देखील सामील आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहिती नुसार सोमवारी दुपारी एक थायलंड हून मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या या एअर इंडियाच्या विमानातील दोघा प्रवाशांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांना धक्का बसला.

चॉकलेट्सच्या बॉक्समध्ये पक्षी लपवले

कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट ( AIU ) ने दोन प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली. त्यात बॅंकॉक वरुन आलेल्या दोघा प्रवाशाच्या सामानात एका चॉकेलेट्स ठेवण्याच्या बॉक्स मध्ये हे पक्षी लपवलेले आढळले. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की हे चारही हॉर्नबिल पक्षी परदेशी असून विसायन आणि सुलावेशी प्रजातीचे आहेत. ही प्रजाती लुप्त झालेल्या प्रजाती पैकी आहे. यांना चॉकलेटने भरलेल्या बॅगच्या आत ठेवून प्लास्टीकच्या कंटेनरमध्ये भरले होते. वनअधिकाऱ्यांनी सांगितले की पक्षी जीवंत आढळले आहे. त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर स्थिर करण्यात आले. त्यांना पाणी पाजण्यात आले. रेसक्विंक एसोसिएशनशी ( RAWW ) संबंधित वन्यजीव तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यांना खाद्य देण्यात आले.

परदेशात रवाना केले

हे भारतातील मूळ असलेले पक्षी नसल्याने त्यांची औपचारिक पूर्ण झाल्यानंतर त्यांची रवानगी बॅंकॉक येथे करण्यात आली. वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोने ( WCCB ) वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या तरतूदीनुसार पक्षांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर त्यांना बॅंकॉकला पाठविण्यात आले.या कायद्यानुसार अवैध तस्करीत जप्त करण्यात आलेल्या परदेशी जानवरांना मुळ देशात पाठविण्याचा कायदा आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?