AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राला घरी बोलावून पार्टी करायचा, मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल !

कामाच्या ठिकाणी दोघांनी ओळख झाली. मग ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले. मित्राच्या घरी मित्राचे येणे-जाणे सुरु झाले. यानंतर या मैत्रीचा जो भयंकर शेवट झाला त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

मित्राला घरी बोलावून पार्टी करायचा, मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल !
अनैतिक संबंधातू पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढलाImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 10, 2023 | 1:01 PM
Share

कन्नौज : उत्तर प्रदेशात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कदायक घटना कन्नौज जिल्ह्यात घडली आहे. राजू शर्मा असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयताची पत्नी आणि मित्र दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी राजूचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. कन्नौजच्या छिब्रामाऊ कोतवाली भागातील सिकंदरपूर येथे ही घटना घडली.

राजू शर्मा हा पत्नी आणि 3 मुलांसह सिकंदरपूर येथे राहत होता. मजुरी करुन शर्मा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. कामाच्या ठिकाणी राजूची सगीर नावाच्या तरुणाशी मैत्री झाली. यानंतर सगीर नेहमी राजूच्या घरी येऊ लागला. सगीर अनेकदा राजूच्या घरी दारुची पार्टी करण्यासाठी यायचा. यादरम्यान राजूची पत्नी आणि सगीर यांच्यात प्रेमसंबंध झाले.

पत्नीला मारहाण केली म्हणून मित्राच्या हत्येचा कट

दरम्यान, महिनाभरापूर्वी राजूचा पत्नीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. यावरुन राजूने पत्नीला मारहाण केली. सगीरला हा प्रकार कळताच तो संतापला. यानंतर त्याने राजूला मार्गावरून हटवण्याचा कट रचला. त्यानुसार, गुरुवारी 8 जून रोजी सगीरने राजूची पत्नी आणि तिच्या मुलांना जत्रा दाखवण्याच्या बहाण्याने नेले. यानंतर त्यांना तेथेच सोडून तो राजूच्या घरी परतला. प्रथम सगीरने राजूला मारहाण केली. यानंतर त्याची हत्या केली.

सकाळी नातेवाईकांनी राजूचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. चौकशीनंतर पोलिसांनी राजूची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा