मद्यधुंद पतीची क्रूरता, बायकोचे केस पकडून उकळत्या तेलात डोकं घातलं

महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

मद्यधुंद पतीची क्रूरता, बायकोचे केस पकडून उकळत्या तेलात डोकं घातलं
बायकोचे केस पकडून उकळत्या तेलात डोकं घातलं
Image Credit source: social
| Updated on: Nov 10, 2022 | 8:55 PM

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद पतीने आपल्या पत्नीसोबत सर्व क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या आहेत. दारु सोडवण्यासाठी पत्नी आपल्या नकळत काही आयुर्वेदिक औषध देत असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचे केस पकडून उकळत्या तेलात तिचे डोके बुडवल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेत पत्नीचा चेहरा गंभीर भाजला आहे. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे.

आरोपी पतीला दारुचे व्यसन होते

जुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टॉवर चौकात बुधवारी रात्री हे अंगावर काटा आणणारे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील सफायर इमारतीत चौकीदार काम करणाऱ्या सुदामा हिरवे याला दारूचे व्यसन आहे. काही दिवसांपासून सुदामा हा आजारी होता.

संशयातून पतीने केले हे भयंकर कृत्य

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी पत्नी आपल्याला काही आयुर्वेदिक औषध देत आहे. यामुळे आपली तब्येत बिघडत असल्याचा सुदामाला संशय आला. याच संशयातून सुदामा हिरवे याने हे राक्षसी कृत्य केले.

बुधवारी रात्री सुदामा घरी आला तेव्हा पत्नी घरात स्वयंपाक करत असल्याचे त्याला दिसले. यानंतर त्याने पत्नीचे डोके उकळत्या तेलात टाकले. यामुळे पत्नी रंजना हिरवे गंभीर भाजली. यावेळी रंजनाने आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले.

महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.