
लग्नानंतरही प्रेम होऊ शकतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण होय, नक्कीच होऊ शकतं. आपण अनेकदा अशा घटना ऐकतो आणि पाहतो, जिथे लग्नानंतरही जोडप्यांचे विवाहबाह्य संबंध असतात. असाच एक विचित्र प्रकार बिहारच्या वैशाली येथून समोर आला आहे. येथे गावकऱ्यांनी तीन मुलांच्या आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. ती तिच्या प्रियकरासोबत बेडरूममध्ये होती. खूप गोंधळ झाला, तेव्हा त्या महिलेच्या प्रियकराने पंचायत बोलावली.
पंचायतीत महिलेचा पतीही उपस्थित होता. तिथे त्या तरुणाने आपल्या प्रियसीच्या भांगेत सिंदूर भरलं. पती हा सगळा प्रकार उभा राहून पाहत राहिला. त्याने फक्त एवढंच सांगितलं, “मला या लग्नाला काहीच आक्षेप नाही. ती तिच्या प्रियकरासोबत राहू दे. फक्त मुलं मी माझ्याकडे ठेवेन.” पतीचं हे बलिदान पाहून सर्वजण थक्क झाले. दुसरीकडे, पत्नीने सांगितलं, “माझ्या तीन मुलांपैकी सर्वात लहान मुलगा हा माझ्या प्रियकराचा आहे.” प्रियकरानेही यावर होकार दिला.
वाचा: तुझी बायको तर अप्सराच…; रोज चिडवायचे मित्र, मग पतीचा संयम सुटला.. केले कांड
हा अनोखा प्रकार चकसिकंदर मंसूरपुर गावातील आहे. येथे तीन मुलांच्या आईने आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत लग्न केलं. गावकऱ्यांनी त्या महिलेला आणि तिच्या प्रियकर रूपेशला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. गोंधळ वाढला तेव्हा रूपेश रामने पंचायत बोलावली. पंचायतीत रूपेशने पारो देवीच्या भांगेत सिंदूर भरलं आणि नाट्यमय रीतीने तिचा हात धरून तिला आपल्या घरी घेऊन गेला. हे लग्न आता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनलं आहे.
पती रमेश राम यांची प्रतिक्रिया
महिलेच्या पतीचं नाव रमेश राम आहे. रमेश म्हणाला, “रूपेशने याआधीही अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आहे. माझ्या बायकोशी त्याचं प्रेमसंबंध गेल्या दोन वर्षांपासून सुरू होतं. तीन वर्षांपूर्वी त्यांची पहिली भेट झाली होती. आता तर पंचायतीसमोर त्याने माझ्या बायकोची भांग भरली आहे. बायको कुठेही राहो, ती तिची मर्जी. मी आनंदाने तिला निरोप दिला आहे. माझं कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. तरीही मुलांना मीच ठेवू इच्छितो.” दुसरीकडे, रूपेश म्हणतो की लहान मुलगा त्याचा आहे आणि तो तिन्ही मुलांना ठेवू इच्छितो. मुलं कोणाकडे राहतील यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
रूपेश राम यांचं म्हणणं
रूपेश राम म्हणाला की, पारो देवीशी त्याचं गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होतं. पारोला त्याने 20 ते 30 हजार रुपये दिले होते, कारण रमेश इतकं कमवत नाही. तसेच, त्याने पारोला अनेक वस्तूही दिल्या आहेत. पारो ही नात्याने त्याची काकू लागते. पारोचं घर त्याच्या घरापासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध सुरू झाले.