आमिष दाखवून भोंदू बाबाने केलं धक्कादायक कृत्य, पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याची घटना ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

| Updated on: Jan 04, 2023 | 12:27 PM

उपनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन खळबळ उडाली आहे. फसवणूक बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

आमिष दाखवून भोंदू बाबाने केलं धक्कादायक कृत्य, पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याची घटना ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
संपत्तीच्या हव्यासातून भावाने भावाला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याने खळबळ उडाली आहे. त्यात विशेष म्हणजे या प्रकरणात जादूटोण्याच्या कलमांचाही समावेश करावा अशी मागणी केल्यानं या गुन्ह्याची अधिकच चर्चा होऊ लागली आहे. अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत एका मांत्रिकाने विवाहित महिलेला घर देण्याचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेत मांत्रिकाच्या कुटुंबाचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या उपनगर परिसरात राहणाऱ्या विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा, त्याही पत्नी सुनिता विष्णू वारुंगसे, मुलगा उमेश विष्णू वारुंगसे आणि मुलगी वैशाली विष्णू वारुंगसे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीस वर्षीय पडीत महिलेच्या फिर्यादीवरुन भोंदूबाबा आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते इतकेच काय त्यांच्यात प्रेमसंबंधही होते. त्यामध्ये विष्णू काशिनाथ वारुंगसे याने विवाहित महिलेला घर देण्याचे आमिष दाखवत पडीतेकडून पाच लाख रुपये घेतले होते.

उपनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन विष्णू काशिनाथ वारुंगसे या भोंदूबाबाने 2018 ते 2022 या काळात लैंगिक अत्याचार केल्याची बाब नमूद केली आहे.

विशेष म्हणजे ही सर्व बाब संशयित विष्णू काशिनाथ वारुंगसे यांच्या पत्नीसह मुलांनाच्या संगनमताने केली असल्याचे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय, नंतर काळात पीडित महिलेने पैसे मागीतल्याने भोंदूबाबाने घर आणि घेतलेले पाच लाख रुपये दिले नाही. त्यात आपल्या अंगात दैवी शक्ती असून तुला जीवे ठार मारील असेही नमूद केले आहे.

संबंधित महिलेने याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला आहे.

फसवणुकीसह बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय यामध्ये या प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावे अशी मागणीही अंनिसने केली आहे.