Buldhana Crime : प्रियकराला भेटायला गेलेल्या डॉक्टर तरुणीला मारहाण, काय घडलं नेमकं?

प्रियकर फोन उचलत नव्हता म्हणून डॉक्टर प्रेयसी त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. मात्र यावेळी प्रियकर भेटला नाही, पण तरुणीसोबत भलतच घडलं. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.

Buldhana Crime : प्रियकराला भेटायला गेलेल्या डॉक्टर तरुणीला मारहाण, काय घडलं नेमकं?
प्रियकराला भेटायला गेलेल्या डॉक्टर तरुणीला मारहाण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 11, 2023 | 5:52 PM

बुलढाणा / 11 ऑगस्ट 2023 : प्रियकराला भेटायला त्याच्या घरी गेलेल्या डॉक्टर तरुणीला मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक कृत्य उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणीचा विनयभंगही केला. सिंदखेडराजा तालुक्यातील बारलिंगा गावात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तिघांवर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश जायभाये, लता जायभये, बद्रिनाथ जायभाये अशी तिघा आरोपींची नावे आहेत. या घटेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीला गावातील काही सूज्ञ नागरिकांनी पोलीस ठाण्यापर्यंत पोहचवले. पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर दोघे डॉक्टर आहेत. दोघेही अमरावतीत वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. प्रियकर फोन उचलत नसल्याने ती त्याला भेटायला त्याच्या घरी आली होती.

काय घडलं नेमकं?

पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वप्नील जायभाये दोघेही डॉक्टर आहेत. दोघेही अमरातीतील दर्यापूर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघांचे गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांचे पटत नाही. यातूनच प्रियकर तिचा फोन उचलत नव्हता. यामुळे त्याला भेटायला ती त्याच्या घरी सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावात गेली. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी तिला जबर मारहाण करत शिवीगाळ केली.

पीडित तरुणीने काही सूज्ञ नागरिकांच्या मदतीने अंढेरा पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने याधीही प्रियकराविरोधात अमरावतीतील नांदगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.