अज्ञात कारणातून तरुणावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

अज्ञात कारणातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला कुणी आणि का केला याबाबत अद्याप स्पष्ट नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

अज्ञात कारणातून तरुणावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
नगरमध्ये अज्ञात कारणातून तरुणावर हल्ला
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 06, 2023 | 9:07 AM

अहमदनगर / कुणाल जयकर : अज्ञात कारणातून एका तरुणावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरला नगर शहरात घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या गळ्यावर आणि छातीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तरुणाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरातील महेश टॉकीज, नटराज हॉटेलजवळ हा हल्ला झाला. तर अमन युनूस शेख असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला आणि कोणी केला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ल्यानंतर रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस पुढील तपास करत आहेत. तपासाअंतीच हल्ल्याचे कारण आणि हल्ला कुणी केला हे स्पष्ट होईल.

कुणाल भंडारीवरील हल्ला प्रकरणी शहर बंदची हाक

तर दुसरीकडे बजरंग दलाचे शहर संघटक कुणाल भंडारीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. भंडारी यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोराला अद्याप अटक केली नाही. त्याच्या निषेधार्थ शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर हल्ल्यानंतर शहरात मूक मोर्चा काढण्यात आला होता. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आली असून उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करण्याची हिंदू संघटनांची मागणी करण्यात येत आहे.

कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून मॅनेजरवर हल्ला

कंपनीचे फर्निचरचे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून एमआयडीसीतील एका कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्लाय झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. सुरेंद्र मौर्या असे हल्ला करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.