कोल्हापुरात तरुणावर गोळी झाडून संपवले, कारण काय?

पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यात घडली. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून हत्येची माहिती दिली.

कोल्हापुरात तरुणावर गोळी झाडून संपवले, कारण काय?
अनैतिक संबंधाच्या संशयातून कोल्हापुरात तरुणाची हत्या
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 06, 2023 | 5:34 PM

कोल्हापूर / भूषण पाटील : अनैतिक संबंधातून एका तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बाळेघोल येथे घडली आहे. भरत बळीराम चव्हाण असं मयत तरुणाचं नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. मुरगूड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी करत आहेत. विकास हेमंत भोसले असे संशयित आरोपीचे नाव आहे. बाळेघोल येथील सेनापती कापशी हद्दीत ही घटना घडली.

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्या

आरोपी विकास मोहिते याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा मयत भरतला संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये वारंवार वाद होते. अखेर या वादाला कंटाळून भरत चव्हाण याने चार वर्षापूर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. मात्र या संशयामुळे विकास मोहिते आणि भरत चव्हाण यांच्यातील खुन्नस कायम आहे.

गोळी झाडून तरुणाची हत्या

या खुन्नसमधून विकासने भरत याला सेनापती कापशी येथे सकाळी 10 च्या सुमारास त्याची बाईक अडवून खाली उतरवले. त्यानंतर गावठी पिस्तुल काढली आणि भरतच्या कानशीलाला लावून थेट गोळी घातली. यानंतर भरत हा रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. भरतचा जागीच मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

भरतची हत्या केल्यानंतर आरोपी मुरगूड पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गु्न्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

सांगलीत क्षुल्लक वादातून मित्रांनी मित्राला संपवले

क्षुल्लक भांडणाचा राग मनात ठेवून तीन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याची घटना सांगलीत घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी ती आरोपींना अटक केली आहे.