किरकोळ वाद टोकाला गेला, मित्रांनीच मित्राचे अपहरण केले मग…

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मित्राने आपल्या अन्य दोन मित्रांसोबत मिळून तरुणचा काटा काढल्याची घटना सांगवलीत उघडकीस आली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळला.

किरकोळ वाद टोकाला गेला, मित्रांनीच मित्राचे अपहरण केले मग...
किरकोळ कारणातून मित्रांनीच केली मित्राची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 4:35 PM

सांगली / शंकर देवकुळे : किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनीच आपल्या मित्राचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना सांगलीत घडली आहे. ओंकार रकटे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळून टाकला. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावची या ठिकाणी धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली आहे. सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हत्या करुन मृतदेह जाळला

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावची येथील ओंकार रकटे या तरुणाचे अपहरण करून हत्या करत त्याचा मृतदेह जाळला. मृतदेह जाळल्यानंतर हाडे नदीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ओंकार याच्या मित्रांनीच ही हत्या केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तिघा मित्रांना अटक केली आहे.

किरकोळ भांडणाचा रागातून केले कृत्य

काही दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे याच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात खदखदत होता. यातून सम्मेदने आपल्या मित्रांच्या मदतीने ओंकार रकटे याचे अपहरण केलं. त्यानंतर ओंकार याला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला.

हे सुद्धा वाचा

आष्टा पोलिसांकडून तिघांना अटक

खुनाच्या घटनेनंतर ओंकार याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची राख आणि हाडे पोत्यात भरून कृष्णा नदीमध्ये टाकून देण्यात आली. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.