AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार यादीतून माझे नाव काढून टाकले; प्रकाश राज यांचा दावा, Video Viral

प्रकाश राज यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर बंगळुरु मतदारसंघाच्या मतदार यादीतून त्यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

मतदार यादीतून माझे नाव काढून टाकले; प्रकाश राज यांचा दावा, Video Viral
प्रकाश राजImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 2:48 PM
Share

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की बंगळुरु मतदारसंघातील त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर हे घडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. तेथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि थिएटर केले. तरीही त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला असल्याचे प्रकाश राज यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. या व्हिडीओमध्ये त्यांनी “चांगला जोक आहे. असाच सुरू ठेवा” हे उपरोधीकपणे म्हटले आहे.

काय आहे प्रकाश राज यांचा व्हिडीओ?

अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते बोलताना दिसत आहेत की, मला तुम्हाला एक जोक सांगायचा आहे. मी त्या 65 लाख मतदारांपैकी आहे ज्याचा बंगळुरु मतदार संघातील मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. तेही एसआयर प्रक्रियेनंतर. मस्त जोक आहे ना. माझा जन्म बंगळूरुमध्ये झाला आहे. मी याच मंतदार संघात राहात आहे. माझी शाळा, कॉलेज आणि थिएटरदेखील इथूनच झाले. हा खरच खूप चांगला जोक आहे. खेळ सुरु आहे.

पुढे ते म्हणाले, आता पाहूया, आपला वोटर आयडी परत मिळवण्यासाठी काय काय कागदपत्रे दाखवावे लागतील. खेळ सुरू आहे. ते लोक आपली सत्ता दाखवण्यासाठी हे सर्व करू शकतात. त्यांचा मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकतात. पण हे लोक त्यांना त्यांच्या सत्तेतून काढून टाकण्यापासून रोखू शकतील का?

व्हिडीओ शेअर करत उपरोधीक टोला

प्रकाश राज यांनी हा व्हिडीओ शेअर करत, जरी तुम्ही काही नागरिकांचा मतदान करण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकता, जे कदाचित तुम्हाला पुन्हा सत्तेवर निवडणार नाहीत. पण ज्या सत्तेवर तुम्ही बसला आहात, तिथून तुम्हाला खाली उतरवण्याच्या आमच्या प्रयत्नाला तुम्ही रोखू शकाल का? या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

प्रकाश राज यांच्या कामाविषयी

प्रकाश राज यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते ‘दृश्यम ३’ या चित्रपटात दिसणार आहेत. प्रकाश राज चित्रपटांशिवाय आपल्या बिनधास्त विधानांमुळेही चर्चेत राहतात. ते प्रत्येक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडतात दिसतात. अलीकडे दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनातही प्रकाश राज सहभागी झाले होते. जंतर मंतर येथील त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी