राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याबाबत पक्षात हालचाली सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात तब्बल सहा तास बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याबाबत पक्षात हालचाली सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात तब्बल सहा तास बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला.
या बैठकीनंतर प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचा सल्ला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “कुणाच्या सल्ल्याने प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही. प्रशांत किशोर यांनी तशा सूचना दिल्या असतील, असं मला अजिबात वाटत नाही,” असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा प्रशांत किशोर यांच्या बैठकीशी कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रदेशाध्यक्ष बदल हा पक्षाचा अंतर्गत विषय असून, याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष घेतात, असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणत्याही व्यक्तीच्या सल्ल्याला निर्णायक महत्त्व नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अनिल पाटील यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना “माझ्या सूत्रांच्या माध्यमातून मला असं वाटतं की, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत कुठेही चर्चा झालेली नाही,” असं त्यांनी म्हटलं.
आपल्याला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यातच सर्वाधिक आनंद असल्याचंही अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं. “कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला काम करण्याची संधी वारंवार द्यावी, हीच माझी इच्छा आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या चर्चांसोबतच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या भूमिकांबाबतही राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच प्रशांत किशोर यांच्या कथित सल्ल्याची भर पडल्याने राष्ट्रवादीतील प्रदेशाध्यक्ष बदलाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नसल्याचं अनिल पाटील यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांचं पद कायम राहणार की राष्ट्रवादीत नेतृत्वबदल होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Published on: Aug 11, 2026 01:45 PM
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल

