टॉप्स ग्रुप घोटाळ्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप चॅट सापडले; राज कपूर यांचे नातू अरमान जैन यांची चौकशी सुरु

| Updated on: Feb 17, 2021 | 11:11 AM

अरमान आज सकाळीच दहा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर झाला आहे.

टॉप्स ग्रुप घोटाळ्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप चॅट सापडले; राज कपूर यांचे नातू अरमान जैन यांची चौकशी सुरु
अरमान जैन
Follow us on

मुंबई : टॉप्स ग्रुप घोटाळा प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांनी अभिनेता अरमान जैन याला आज चौकशीसाठी (Arman Jains Interrogation By ED Officials) हजर राहण्याबाबत समन्स बजावलं होतं. त्यानुसार, अरमान आज सकाळीच दहा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर झाला आहे. अरमान हा टॉप्स सिक्युरिटी घोटाळा प्रकरणातील एक संशयित विहंग नाईक यांच्या संपर्कात होता. व्यवहारा बाबतचे काही आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप चॅट सापडल्याने अरमान याची ईडी अधिकाऱ्यांना चौकशी करायची आहे. अरमान हा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांचा नातू आहे (Arman Jains Interrogation By ED Officials).

टॉप्स सिक्युरिटी घोटाळा प्रकरण

काही दिवसांपूर्वी टॉप्स सिक्युरिटी घोटाळा उघडकीस आला आहे. एमएमआरडीएला ट्राफिक वॉर्डन पुरवण्याबाबतचा हा घोटाळा आहे. एमएमआरडीएला 500 ट्राफिक वॉर्डन पुरवण्याचं कंत्राट टॉप्स सिक्युरिटीला मिळालं होतं. टॉप्स सिक्युरिटी मात्र, 75 टक्के ट्राफिक वॉर्डन पुरवत होती आणि बाकी वॉर्डन यांची नेमणूक न करताच पैसे लाटत होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास ईडीने सुरु केला आहे. या गुन्ह्यात टॉप्स सिक्युरिटीचे मालक राहून नंदा आदी 11 जण आरोपी आहेत. यापैकी काही जणांना अटक झाली आहे.

याच गुन्ह्यात शिवसेनेचे आमदार, नेते प्रताप सरनाईक यांची अनेकदा चौकशी झाली आहे. त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी झाली आहे. विहंग याच्या चौकशीत अरमान जैन याचा ही या प्रकरणात सहभाग असावा, असा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. विहंग आणि अरमान हे जवळचे मित्र आहेत.

विहंग याच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटचा तपास करत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांना विहंग आणि अरमान यांच्यात टॉप्स सिक्युरिटीच्या व्यवहाराबाबत चर्चा झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याशी अरमान याचा काय संबंध आहे का, याचा ईडीचे अधिकारी शोध घेत आहेत.

अरमान जैनच्या घरी ईडीची धाड

काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरमान याच्या दक्षिण मुंबईतील घरी धाड टाकून काही कागदपत्र शोधली आहेत. यावेळी काही महत्वाचे कागदपत्र ईडी अधिकाऱ्याच्या हाती लागली आहेत.

याच कागदपत्राबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना अरमान याची चौकशी करायची आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी अरमान याला समन्स बजावण्यात आलं होतं. यावेळी अरमान याला 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता चौकशी कामी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र,अरमान आला नव्हता. त्यावेळी त्याचे मामा अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झाल्याने त्याचं कुटुंब दुःखात असल्याने तो आला नव्हता (Arman Jains Interrogation By ED Officials).

यानंतर परवा सोमवारी 15 फेब्रुवारी रोजी त्याला पुन्हा समन्स बजावून आज 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितलं होत. त्यानुसार, आज अरमान चौकशीसाठी हजर झाला आहे. पुढील काही तास त्याच्याकडे चौकशी चालण्याची शक्यता आहे.

Arman Jains Interrogation By ED Officials

संबंधित बातम्या :

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच?

इथे राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त, तिथे रणबीर-करीनाचा आत्तेभाऊ अरमान जैनच्या घरी ईडीची धाड