सारं काही संपलं, घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जाण्याचं दु:ख, पत्नी-मुलीचं टोकाचं पाऊल, हृदयद्रावक घटना

| Updated on: Aug 17, 2021 | 3:01 PM

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नी आणि मुलीने देखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

सारं काही संपलं, घरातल्या कर्त्या पुरुषाच्या जाण्याचं दु:ख, पत्नी-मुलीचं टोकाचं पाऊल, हृदयद्रावक घटना
सांकेतिक फोटो
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात एक मन पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या पत्नी आणि मुलीने देखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माय-लेकीच्या आत्महत्येमागे आणखी दुसरं काही कारण होतं का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी 62 वर्षीय बाबूल दास यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जेएनएम रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान रविवारी (15 ऑगस्ट) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या सर्व नियमावली लक्षात घेऊन बाबलू दास यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आलं. यावेळी बाबूल यांच्या पत्नू आणि 22 वर्षीय मुलगी देखील होती. तसेच परिसरातील त्यांचे इतर स्नेही देखील होते.

आई आणि मुलीचं टोकाचं पाऊल

बाबूल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर घरी आलेल्या पत्नी आणि मुलीला शोक अनावर झाला. त्यांनी दु:खात टोकाचा निर्णय घेतला. घरातल्या कर्त्या पुरुषाशिवाय आयुष्य जगणं अशक्य आहे, असा विचार करुन दोघी माय-लेकीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येची घटना उघड कशी झाली?

माय-लेकीच्या आत्महत्येनंतर घरातून काहीच चाहूल येत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शेजारी राहत असलेल्या महिलेने आवाज दिला. महिलेने माय-लेकींना आवाज दिला. पण त्यांचा आवाज न आल्याने महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून घराची पाहणी केली. त्यांनी घराचा दरवाजा तोडला. यावेळी माय-लेकींचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. माय-लेकींनी शोकात आत्महत्या केली की आणखी वेगळं कारण होतं? याचाही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :

ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!

शेतकऱ्यांना उधारी-वसुलीसाठी धमकीचे फोन, कृषी सेवा केंद्राची महिला संचालिका पतीसह पसार