ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!

ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीच्या भीतीने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली. हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे आपल्याला आता ब्लॅक फंगस होईल या भीतीने दोघांनी सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं.

ब्लॅक फंगसच्या भीतीने आत्महत्या करतोय, अंत्यसंस्कारासाठी 1 लाख ठेवलेत, पोलिसांना फोन करुन सुसाईड!
Mangalore Couple Suicide

बंगळुरु : ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीच्या भीतीने एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली. हे दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे आपल्याला आता ब्लॅक फंगस होईल या भीतीने दोघांनी सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं. या सुसाईड नोटमध्ये पती म्हणतो, “माझ्या पत्नीला मधुमेह आहे, न्यूज चॅनल्सनी दाकवलं आहे, त्यानुसार ज्या मधुमेही रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका आहे. त्यामुळे आपले अवयव गमावू शकतो. त्याची किंमत चुकवावी लागू शकते, त्यामुळे आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला” (Mangalore Couple Suicide Karnataka Couple died by suicide after infected with COVID19 black fungus. )

रमेश (40) आणि गुना सुवर्णा (35) असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही मंगलोरमध्ये एका आपर्टमेंटमध्ये राहात होते. रमेशची पत्नी गुना सुवर्णा ही मधुमेहाने पीडित होती.

सुसाईड नोट

गेल्या काही दिवसापूर्वी दोघांनाही कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे व्यथित झालेल्या दाम्पत्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी या दाम्पत्याने आपल्या मेसेजची ऑडिओ क्लिप शहर पोलीस आयुक्त एन शशीकुमार यांना पाठवली होती. यामध्ये त्यांनी ब्लॅक फंगसमुळे भीती वाटत असल्याचं म्हणत आम्ही आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांकडून शोधाशोध 

यावर पोलीस आयुक्तांनी कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन केलं. त्यांनी तातडीने या दाम्पत्याचा शोध सुरु केलं. इतकंच नाही तर त्यांनी मीडियालाही आवाहन करुन, या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत या दाम्पत्याने आत्महत्या केली होती.

रमेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गुना सुवर्णाच्याही आरोग्याच्या समस्येबाबत लिहिलं आहे. गुना सुवर्णाला अपत्य होत नसल्याने, ती समाजात वावरताना दचकत होती. सातत्याने तिला विचारणा होत असल्याने तिला अवघडल्यासारखं वाटत होतं.

अंत्यसंस्कारासाठी 1 लाख, घरमालकांची माफी

पुढे पत्नीनेही याच सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ती म्हणते, “मी आणि माझ्या पतीने ठरवलं आहे की आमच्यावर पारंपारिक अंत्यसंस्कार व्हावेत, त्यासाठी आम्ही 1 लाख रुपये ठेवले आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्त एन शशीकुमार, शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांनी आमच्या अंत्यसंस्कारासाठी सहकार्य करावं”

इतकंच नाही तर घरातील साहित्य गरिबांना वाटा, आम्ही आमच्या घरमालकांची माफी मागतो, असंही या सुसाईड नोटमध्ये नमूद आहे.

संबंधित बातम्या  

क्राईम शो पाहून चिमुरडी म्हणालेली माझ्यावरही लैंगिक अत्याचार, आता पाच वर्षांनी 55 वर्षांचा शेजारी निर्दोष सुटला

गजानन काळेच्या अटकेसाठी संजीवनी काळेंचे रामदास आठवलेंना साकडे

Published On - 1:50 pm, Tue, 17 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI