
सध्या सगळीकडे शिलाँगला फिरायला गेलेल्या कपलची चर्चा सुरु आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर येथे राहाणारे राजा रघुवंशी लग्नानंतर पत्नी सोनमला घेऊन मेघालयातील शिलाँगला हनीमूनला गेला होता. अचानक दोघांचेही फोन स्विचऑफ येऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. तापस सुरु असताना राजा रघुवंशी यांचा मृतदेह दरीत सापडला तर पत्नी सोनमचा थांगपत्ता लागलेला नाही. राजा आणि सोनमच्या कुटुंबातील सर्वजण न्याय मागताना दिसत आहेत. दरम्यान, राजाची बहिण श्रष्टी चर्चेत आहे. तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
राजा रघुवंशीचा मृतदेह दरीत सापडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर राजाच्या बहिणीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. एका यूजरने तिचा व्हिडीओ शेअर करत, ‘अलिकडेच शिलाँग येथून नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याचे ऐकायला मिळाले आणि त्यामधील मुलाच्या बहिणीचे हे प्रोफाइल मला सापडले. ती तिच्या अकाउंटवरील ट्रॅफिकचा वापर सलग जाहिरातींसाठी करत आहे. जेव्हा जेव्हा मला वाटते की मी सर्वात वाईट मानव पाहिले आहेत, तेव्हा मी चुकीचा असल्याचे सिद्ध होते’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: पती सिव्हिल सर्व्हिस अधिकार, टूरिझम कंपनी… 500 पाक हेरांचं स्वप्न पाहणारी ती ‘मॅडम N’ कोण?
shrasti Raghuwanshi
नेमकं प्रकरण काय?
इंदूरचे ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशी त्यांच्या पत्नीसोबत हनीमून साजरा करण्यासाठी मेघालयातील शिलाँगला गेले होते. या कपलचे मोबाईल फोन स्विच ऑफ आल्याने घरच्यांनी काळजी वाढली. त्यानंतर घरच्यांनी पोलिस तक्रार केली. त्यानंतर तपासात राजा रघुवंशीचा मृतदेह एका दरीत सापडला. त्याने स्थानिकांकडून भाड्याने घेतलेली गाडी तुटलेल्या अवस्थेत सापडली होती. राजाची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दरीत टाकून दिल्याची माहिती समोर आली आहे. आता त्याची पत्नी सोनमचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. तिचा शोध पोलिस घेत आहेत.