पती सिव्हिल सर्व्हिस अधिकारी, टूरिझम कंपनी… भारतात 500 पाक हेरांचं स्वप्न पाहणारी ती ‘मॅडम N’ कोण?
मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील ISIची एजंट असणारी मॅडम N सध्या चर्चेत आहे. तिचे भारतात 500 पाकिस्तानी हेरांचे जाळे उभं करण्याचे स्वप्न होते.

भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्सच्या माध्यमातून हेरगिरी करवणे आणि स्लीपर सेल तयार करण्याच्या पाकिस्तानच्या मोठ्या षड्यंत्राचा पर्दाफाश झाला आहे. या षड्यंत्राची कडी पाकिस्तानातील एका महिलेशी, मॅडम Nशी जोडली गेली आहे. आता ही मॅडम N नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिचे स्वप्न होते की भारतात पाकिस्तानी हेर आणि ISIचे नेटवर्क उभे करायचे. आता ही महिला आहे तरी कोण? चला जाणून घेऊया…
कोण आहे मॅडम N?
पहलगाम हल्ल्यासाठी ज्योती मल्होत्राला मॅडम Nने तयार केले होते. तिचे खरे नाव नौशाबा शहजाद मसूदशी आहे. ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांसाठी ‘मॅडम N’ म्हणून ओळखली जाते. नौशाबा पाकिस्तानातील लाहोर येथे ट्रॅव्हल आणि टूरिझमचा व्यवसाय चालवते. तिच्या ट्रॅव्हल एजन्सीचे नाव ‘जैयाना ट्रॅव्हल्स अँड टूरिझम’ आहे. तिचा पती हा पाकिस्तानच्या सिव्हिल सर्व्हिसमधील निवृत्त अधिकारी आहे. तपासात समोर आले आहे की, नौशाबा ISI आणि पाकिस्तानी सैन्याच्या इशाऱ्यावर भारतात 500 हेरांचे नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न करत होती.
ती षड्यंत्र कसे रचत होती?
नौशाबा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्सना पाकिस्तानात फिरवण्याचे आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांची भेट पाकिस्तानी सैन्य आणि ISI अधिकाऱ्यांशी करून दिली जायची. ती विशेषतः हिंदू आणि शीख समुदायातील लोकांना लक्ष्य करत होती. तपासात हेही समोर आले आहे की, गेल्या 6 महिन्यांत नौशाबाने सुमारे 3000 भारतीय आणि 1500 परदेशात राहणाऱ्या भारतीयांना पाकिस्तानात पाठवले आहे. यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगाशी थेट संपर्कात होती. ती व्हिसाशी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कोणाचाही व्हिसा तात्काळ मंजूर करवत होती.
हिंदू आणि शीखांना लक्ष्य
नौशाबाची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या व्हिसा विभागातही चांगली पकड होती. ती थेट फर्स्ट सेक्रेटरी व्हिसा सुहैल कमर आणि काउन्सलर ट्रेड उमर शेरयार यांच्या संपर्कात होती. म्हणजेच, नौशाबा ज्याला सांगेल, त्याला एका फोनवर तात्काळ व्हिसा मिळायचा. पाकिस्तानी दूतावासात व्हिसा ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या ISI अधिकारी दानिश याच्याशीही तिची थेट बोलणी होत होती.
