AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते वाचले असतील का? 25 दिवसांपूर्वीच लग्न झालं, हनीमूनला गेले अन् 1000 फूट खोल दरीत कोसळली कार; काय घडलं असेल?

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हनीमूनला गेलेले कपल बेपत्ता झाले आहे.

ते वाचले असतील का? 25 दिवसांपूर्वीच लग्न झालं, हनीमूनला गेले अन् 1000 फूट खोल दरीत कोसळली कार; काय घडलं असेल?
CoupleImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 03, 2025 | 3:53 PM
Share

प्रतापगड येथील एक नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी सिक्किमला गेले होते. ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. 29 मे रोजी पर्यटकांनी भरलेले वाहन मंगन जिल्ह्यातील एका डोंगरावर अपघातग्रस्त होऊन हजारो फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, दोन जण जखमी झाले, तर आठ जण बेपत्ता आहेत. याच घटनेत प्रतापगडच्या सांगीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहटिकर गावातील 29 वर्षीय कौशलेन्द्र प्रताप सिंह आणि त्यांची पत्नी अंकिता (26) यांचा समावेश आहे. त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

कुटुंबीयांनी सांगितले की, 5 मे रोजी या दोघांचे लग्न झाले होते. 24 मे रोजी नवदांपत्य कौशलेन्द्र आणि अंकिता हनीमूनसाठी उत्तर सिक्किमच्या मंगन जिल्ह्यातील चुंगथांग परिसरात गेले होते. तिथून ते एका पर्यटक वाहनातून फिरत गंगटोकमधील हॉटेलवर 29 मे च्या रात्री परतत होते. वाहनात ड्रायव्हरसह 10 पर्यटक होते. रात्री जोरदार पाऊस पडत होता, तेव्हा पर्यटकांनी भरलेले हे वाहन सुमारे हजार फूट खोल तिस्ता नदीच्या दरीत कोसळले. स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तीन जणांना वाचवले, पण एकाचा जागीच मृत्यू झाला होता.

वाचा: भाजप नेत्याच्या लेकाने प्रेयसीसोबत नको तो व्हिडीओ बनवला, बायकोला दाखवायचा… चुकून एक व्हायरल झाला अन्…

जखमी झालेल्या दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंकिता आणि कौशलेन्द्र यांच्यासह आठ जण बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध लष्कर आणि बचाव पथक घेत आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, अंकिता लखनऊच्या मेदांता रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहे, तर कौशलेन्द्र दिल्लीत सनदी सेवेची तयारी करत होते. या अपघाताची बातमी ऐकताच दोन्ही कुटुंबांमध्ये खळबळ माजली. कौशलेन्द्र हे त्यांच्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य आहे. दोन्ही कुटुंबे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत. अद्याप मुलांचा काहीच पत्ता लागलेला नाही.

जिल्हा प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके एकत्रितपणे सतत मदत कार्यात गुंतली आहेत. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, अपघातात आठ जण अजूनही बेपत्ता आहेत. प्राथमिक अहवालानुसार, बेपत्ता लोकांपैकी सहा जण ओडिशाचे आणि दोन जण लालगंज, प्रतापगड येथील रहिवासी आहेत. अपघाताच्या दिवशी वाहन थेट तिस्ता नदीत कोसळले होते. हवामान खराब झाल्याने बचाव कार्य अधिक कठीण होऊ शकते, कारण पावसामुळे पाण्याची पातळी वाढू शकते. हा भाग भूस्खलनग्रस्त आहे आणि येथे अशा आव्हानांचा सामना नेहमीच करावा लागतो.

सिक्किमच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पुढील दोन-तीन महिने अशी परिस्थिती कायम राहू शकते. एसडीएम आणि एसडीपीओ यांना शोध मोहीम सतत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपघातस्थळी 7-8 किलोमीटर रस्ते पूर्णपणे बंद आहेत. घटनास्थळी उपस्थित पथके बचाव कार्य चालवत आहेत.

एसपी सोनम डेचू भूटिया यांनी सांगितले की, आव्हानात्मक हवामान परिस्थिती असूनही बचाव कार्य सुरू आहे. अपघातानंतर पर्यटक बेपत्ता झाले आहेत. 29 मे च्या रात्री दोन जणांना सुरक्षित वाचवण्यात आले. उर्वरित आठ जणांचा शोध घेण्यासाठी आयटीबीपी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी बचाव मोहीम सुरू केली आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.