Kashmir : काश्मीर खोऱ्यात आणखी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार राहा; दहशतवाद्यांच्या धमकीने खळबळ

| Updated on: Aug 17, 2022 | 2:26 AM

15 ऑगस्ट रोजी काश्मीरमध्ये विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीनंतर दहशतवाद्यांनी असा इशारा दिला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

Kashmir : काश्मीर खोऱ्यात आणखी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार राहा; दहशतवाद्यांच्या धमकीने खळबळ
काश्मीर खोऱ्यात आणखी हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार राहा
Image Credit source: Twitter
Follow us on

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी गैर-मुस्लिमां (Non-Muslims)बाबत नवा इशारा दिला आहे. या इशाऱ्याअंतर्गत गैरमुस्लिम आणि काश्मीरबाहेरील लोकांवर आणखी हल्ले (Attack) केले जातील, अशी धमकी (Threat) दहशतवाद्यांनी दिली आहे. गृह मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, हा इशारा आणि दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांत सुरु ठेवलेले हल्ले या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी काश्मीरमध्ये विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीनंतर दहशतवाद्यांनी असा इशारा दिला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

सफरचंदाच्या बागेत घुसून दहशतवाद्यांनी केला अंदाधुंद गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये पुन्हा एकदा एका काश्मिरी हिंदूची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. काश्मीर पोलिसांनी या घटनेबद्दल सांगितले की, शोपियानमधील सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एक नागरिक ठार झाला, तर त्याचा भाऊ जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी ज्या दोघांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केला ते दोघेही भाऊ हिंदू आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. पोलिसांनी ट्विट केले आहे की, शोपियानच्या छोटापोरा भागात एका सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. दोघेही अल्पसंख्याक समुदायाचे (हिंदू धर्मीय) आहेत. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी टार्गेट केलेल्या एका भावाचे नाव सुनील कुमार असून दुसऱ्याचे नाव पिंटू असे आहे.

सुनील कुमारच्या कुटुंबाने 1990 च्या दशकातही खोरे सोडले नव्हते!

काश्मीर खोऱ्यातील बंडखोरीविरोधी कारवायांच्या प्रभारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्येतील एका साक्षीदाराने काटापोरा येथील आदिल वाणीची ओळख पटवली आहे. त्याआधारे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडित सुनील कुमारचे कुटुंब 1990 च्या दशकातही काश्मीरमधून स्थलांतरित न झालेल्या कुटुंबांपैकी एक आहे. अलीकडेच काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद शिगेला पोहोचला होता. अनेक टार्गेट किलिंग घडले. त्यादरम्यान सुनील कुमारच्या घराबाहेर जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक गार्ड तैनात करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

टार्गेट किलिंग आणि ग्रेनेड फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता

सुनील कुमार व त्याच्या भावाने लोकांना ‘तिरंगा रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याच कारणावरून या दोन्ही भावांना टार्गेट करून त्यांच्यावर गोळीबार केला आहे, असा दावा ‘अल बद्र’ची शाखा असलेल्या ‘काश्मीर फ्रीडम फायटर्स’ या दहशतवादी संघटनेने केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे असे इनपुट आहेत की सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात लहान शस्त्रे आणि दारू गोळ्याची तस्करी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात टार्गेट किलिंग आणि ग्रेनेड फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. (After the killing of Kashmiri Pandits in Jammu and Kashmir, terrorists issue a new warning against non-Muslims)