दोन्ही बाजूने लग्नाची उत्सुकता वाढली, प्रेयसीने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला, संतापलेल्या नातेवाईकांनी टोकाचा निर्णय घेतला

चार वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर दुसरीकडे लग्न करणाऱ्या तरुणाला प्रेयसीने चांगलाचं धडा शिकवला असल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतला. त्यानंतर नवरीच्या नातेवाईकांनी मंडपातील एका तरुणाशी लग्न लावलं आहे.

दोन्ही बाजूने लग्नाची उत्सुकता वाढली,  प्रेयसीने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला, संतापलेल्या नातेवाईकांनी टोकाचा निर्णय घेतला
crime newsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 9:40 AM

अहमदनगर : अहमदनगरच्या राहाता (Ahmandnagar Rahata) येथील एका मुलीचा विवाह नाशिक शहरात (nashik city) राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता. काल त्यांचा राहाता येथील मंगलकार्यालयात विवाह होणार असल्यामुळे, जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. लग्न घटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला पोहोचला होता. नवरदेव पंकज वाजत-गाजत विवाहस्थळी पोहचला. मात्र तो बोहल्यावर चढण्याआगोदरच त्याची प्रियेसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली. पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तीने सांगताच विवाहस्थळी (wendding news) एकच खळबळ उडाली. पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तीच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ विवाहास नकार देत हा विवाह रद्द केला गेला. दरम्यान या वधुसाठी कुटूंबियांनी नात्यातीलच दुसरा नवरदेव शोधला आणि मुलीचे ‌त्याचेशी लग्न लावून दिले.

Ahmandnagar Rahata

Ahmandnagar Rahata

नातेवाईकांनी तिथून काढता पाय घेतला

राहाता पोलिसांनी पंकज याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली, त्यावेळी नवरदेवाने त्या तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तक्रारीपूर्वी कलवरे, कलवऱ्या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव पोलीस स्टेशनला मात्र एकटाच दिसत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे. नवरदेवाचा हा प्रकार उजेडात आल्यानंतर त्यांच्या सुध्दा नातेवाईकांनी तिथून काढता पाय घेतला. आता पोलिस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
nashik city

nashik city

लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे फसवणूक

पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा पिडीत तरुणीने केला आहे. त्यामुळे पिडीतेच्या फिर्यादीवरून पंकज याच्यावर भादवि कलम ३७६ आणि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा आता नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकज याला नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. पंकजने प्रियेसीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तीची फसवणूक केली. तर राहाता पोलीस वेळीच विवाहस्थळी पोहचल्याने दुसरी मुलगी फसवणूक होण्यापूर्वी वाचली आणि बोहल्यावर चढण्याआधीच पंकजवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.

nashik city

nashik city

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.