तू आधी माझ्याशी संबंध ठेव, तेव्हाच मी… गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी मदत मागितली, पोलिसांनीच…

अलीगडमधील एका महिलेने पोलिस अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. मदत मागण्यासाठी पोलीस स्टेशन गेल्यानंतर पोलिसाने तिच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. यानंतर पोलिस अधिकारी तिला धमक्या देण्यासाठी तिच्या घरी आला आणि त्याने अश्लील संदेश पाठवले. पीडित महिलेने आता दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

तू आधी माझ्याशी संबंध ठेव, तेव्हाच मी... गर्लफ्रेंडसोबत पळालेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी मदत मागितली, पोलिसांनीच...
Crime
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 24, 2025 | 7:47 PM

उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एका महिलेने पोलिसावर गंभीर आरोप केला आहे. या पोलिसाला मदत मागायला गेले. त्याने मदत करण्याच्या बदलात खोलीत येण्यासाठी दबाव टाकला होता. व्हाईस मेसेज पाठवून व्हॉट्सअपवर अश्लील लिंकही पाठवल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या पोलिसाचा हा काळा कारनामा तिने शेजारी राहणाऱ्या महिला पोलिसाला सांगितला. पोलिसाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा तो या महिलेवर चांगलाच भडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा पोलीस काही पोलिसांना घेऊन या महिलेच्या घरी गेला. तिथे या महिलेला धमकावू लागला. तू माझ्याशी एकदा संबंध ठेव. मी तुला पूर्ण मदत करेल, असं त्याने या व्हाईस मेसेजमध्ये म्हटलं होतं. हरदुआगंज पोलीस ठाण्याचं हे प्रकरण आहे. आरोपी या पोलीस ठाण्यातच पोलीस म्हणून काम करतोय.

वाचा: नवऱ्याच्या हत्येचा प्लानिंग कधीपासून होता? पल्लवी Google वर काय सर्च करत होती? धक्क्यामागून धक्के

खाकी गणवेशाच्या आडून माझ्याशी दुष्कर्म करण्याचा प्रयत्न या पोलिसाने केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. पीडित महिलेने पोलिसावर लावलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तसेच सृजना सिंह यांच्या नेतृत्वात एक कमिटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे.

लहान वयात लग्न

ही 30 वर्षीय महिला हरदुआगंज येथील रहिवाशी आहे. वयाच्या 15 व्या वर्षी तिचं लग्न झालं. हाथरस येथील खिटोली गावातील 40 वर्षीय राकेशची तिचं लग्न झालं होतं. 2017मध्ये ती नवऱ्यापासून वेगळी झाली होती. त्याच गावातील राजू नावाच्या व्यक्तीवर जीव बसल्यानंतर तिने त्याच्याशी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर हे दोघे गेल्या 8 वर्षापासून दिल्लीत राहत होते. त्यांना दोन मुलंही आहेत.

नवरा पळाला

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हरियाणातील पलवलच्या मोहाना पोलीस ठाण्याद्या हद्दीतील भूड कॉलनीतील सुंदरी नावाच्या तरुणीसोबत राजूचे अवैध संबंध सुरू झाले होते. याची माहिती मिळाल्यावर ही महिला मुलांना घेऊन माहेरी आली. मात्र, 26 जानेवारी रोजी तिचा नवरा राजू हा सुंदरीला घेऊन पळून गेल्याचं तिला कळलं. तेव्हापासून ही महिला नवऱ्याचा शोध घेत आहे. नवरा सापडत नसल्याने वैतागलेल्या या महिलेने अखेर पोलीस स्टेशन गाठले होते. हरदुआगंज पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली होती. पण दिनेश नावाच्या पोलिसाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.