छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अभिनेत्रीवर अनैसर्गिक अत्याचार

मुंबईतल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय? अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीला काय आश्वासन दिलेलं?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अभिनेत्रीवर अनैसर्गिक अत्याचार
अधिक व्याजाचे आमिष दाखवत फसवणूक
| Edited By: | Updated on: Aug 02, 2023 | 5:04 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यावर अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. पुनीत सिंगवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीने पुनीत सिंगवर हे आरोप केले आहेत. या संदर्भात मुंबईच्या वनराई पोलिस ठाण्यात पुनीत सिंग विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याने शब्द फिरवला

पुनीतनं आपल्याला लग्नाचे आश्वासन दिलं होतं. पण त्याने शब्द फिरवला. लग्नाच आमिष दाखवून पुनीतने लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याच तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

कुठल्या कलमातंर्गत गुन्हा ?

वनराई पोलिसांनी अभिनेता पुनीत सिंग राजपूत विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६ (२) (द), ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिस अधिक तपास करत आहेत.