AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 OTT Release : सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ लवकरच ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?

Border 2 OTT Release : सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. हा वॉर ड्रामा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख नुकतीच समोर आली आहे.

Border 2 OTT Release : सनी देओलचा 'बॉर्डर 2' लवकरच ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?
Border 2 Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 04, 2026 | 1:57 PM
Share

अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 23 जानेवारी 2026 रोजी सनी देओलचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. शिवाय बॉक्स ऑफिसवर त्याची कमाईसुद्धा चांगली सुरू आहे. यासोबतच चाहते हा देशभक्तीपर चित्रपट घरी बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘बॉर्डर 2’च्या ओटीटी रिलीजची अनेकजण प्रतीक्षा करत आहेत. अशातच त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या स्ट्रीमिंगविषयीची माहिती समोर आली आहे.

‘बॉर्डर 2’ ओटीटीवर कधी आणि कुठे पहायला मिळणार?

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2026 या वर्षातील पहिला हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात भारतातील आणि जगभरातील कमाईत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाचे स्ट्रीमिंग हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होणार आहे. येत्या 20 मार्चपासून ‘बॉर्डर 2’ नेटफ्लिक्सवर पहायला मिळेल, अशी माहिती समोर येत आहे. परंतु याबद्दल अद्याप चित्रपटाच्या टीमने किंवा नेटफ्लिक्सने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.

‘बॉर्डर 2’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘बॉर्डर 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. अॅडव्हान्स तिकिटांची बुकिंग जोरदार झाल्याने त्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये पहायला मिळाला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 224.25 कोटी रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या आठवड्यापर्यंत कमाईचा आकडा 286 कोटी रुपयांवर पोहोचला होता. तिसऱ्या आठवड्यात हा आकडा 300 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं बजेट 275 कोटी रुपये असून बजेटचा हा आकडा कमाईने आधीच पार केला आहे. त्यामुळे यापुढील कमाई ही नफ्यात मोजली जाणार आहे. बॉर्डर 2 हा सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट होता. त्यामुळे थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. बॉर्डरचा पहिला भागसुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.